इराणकडून मोजतबा खामेनेईंचा दुर्मीळ व्हिडिओ जारी; प्रकृतीबाबतच्या चर्चांना मिळाला नवा संदर्भ
तेहरान, 25 ऑगस्ट (हिं.स.)।इराणने प्रथमच आपल्या सर्वोच्च नेते मोजतबा अली खामेनेई यांचा धार्मिक शैक्षणिक अभ्यास सत्राचे अध्यक्षस्थान भूषवतानाचा दुर्मीळ व्हिडिओ जारी केला आहे. या व्हिडिओमध्ये ५६ वर्षीय मोजतबा एका विद्यार्थ्याला प्रबंध सादरताना ऐकताना
इराणकडून मोजतबा खामेनेईंचा दुर्मीळ व्हिडिओ जारी; प्रकृतीबाबतच्या चर्चांना मिळाला नवा संदर्भ


तेहरान, 25 ऑगस्ट (हिं.स.)।इराणने प्रथमच आपल्या सर्वोच्च नेते मोजतबा अली खामेनेई यांचा धार्मिक शैक्षणिक अभ्यास सत्राचे अध्यक्षस्थान भूषवतानाचा दुर्मीळ व्हिडिओ जारी केला आहे. या व्हिडिओमध्ये ५६ वर्षीय मोजतबा एका विद्यार्थ्याला प्रबंध सादरताना ऐकताना आणि त्यावर आपले मत मांडताना दिसत आहेत.

मोजतबा यांच्या प्रकृतीबाबत वाढत्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर हा व्हिडिओ समोर आला आहे. वृत्तांनुसार, २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या संयुक्त हल्ल्यांमध्ये ते गंभीर जखमी झाले होते. या हल्ल्यात त्यांचे वडील आणि त्यांच्यापूर्वी इराणचे सर्वोच्च नेते राहिलेले अली खामेनेई यांचा मृत्यू झाला होता.इराणच्या न्यूज एजन्सीने शेअर केलेल्या या यापूर्वी कधीही समोर न आलेल्या व्हिडिओमध्ये मोजतबा यांचा आवाजही ऐकू येतो. ते विद्यार्थ्यांना इराण सरकारच्या ‘इस्लामिक सुरक्षा मॉडेल’ विषयी समजावताना दिसतात.

व्हिडिओमध्ये मोजतबा यांनी आपल्या विद्यार्थ्याच्या प्रबंधाला २० पैकी १९.५ गुण दिले असून, त्याचे वर्णन ‘निर्दोष’ असे केले आहे. या व्हिडिओला कोणतीही तारीख देण्यात आलेली नाही. त्यामुळे जगभरात इराणच्या राजकीय आणि लष्करी व्यवस्थेत मोजतबा यांची पडद्यामागील भूमिका आणि नेतृत्व याबाबत चर्चा सुरू असताना, या व्हिडिओमधून त्यांच्या स्थितीची दुर्मीळ झलक मिळाली आहे.

मात्र, हा व्हिडिओ नेमका कधी रेकॉर्ड करण्यात आला होता, हे स्पष्ट झालेले नाही. वडील अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर ५६ वर्षीय मोजतबा खामेनेई यांची इराणच्या सर्वोच्च नेतेपदी नियुक्ती करण्यात आली. युद्ध सुरू झाल्यापासून मोजतबा सार्वजनिक ठिकाणी दिसलेले नाहीत.अनेक अमेरिकी अधिकारी आणि माध्यमांतील वृत्तांनुसार, २८ फेब्रुवारीच्या हल्ल्यांमध्ये त्यांच्या चेहऱ्यावर आणि पायांवर गंभीर दुखापत झाली होती आणि त्यातून ते अद्याप सावरत आहेत.

एप्रिलमध्ये एका वृत्तपत्राच्या सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, मध्य तेहरानमधील सर्वोच्च नेत्यांच्या निवासस्थानी झालेल्या हल्ल्यात मोजतबा यांच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली होती. तसेच त्यांच्या एका किंवा दोन्ही पायांनाही गंभीर दुखापत झाल्याचे सांगण्यात आले होते.८६ वर्षीय अली खामेनेई यांचा मृत्यू अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यांच्या पहिल्याच दिवशी झाला होता. त्यानंतर पश्चिम आशियात मोठ्या प्रमाणावर युद्ध भडकले.

--------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande