
नांदेड, 25 ऑगस्ट (हिं.स.)। भारतीय जनता पक्षाचे आमदार तुषार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली मुखेड-कंधार विधानसभा मतदारसंघातील मुखेड तालुका खरेदी-विक्री संघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी आमच्या पॅनलच्या एकूण 16 उमेदवारांनी गटनिहाय नामनिर्देशन पत्रे अत्यंत उत्साहात दाखल केली.
नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा अध्यक्ष आणि या भागाचा स्थानिक आमदार म्हणून सहकार क्षेत्राच्या माध्यमातून शेतकरी, कष्टकरी आणि सामान्य जनतेच्या हिताचे रक्षण करणे हेच आमचे अंतिम ध्येय आहे. जिल्हा बँकेप्रमाणेच खरेदी-विक्री संघातही पारदर्शक, शेतकरीभिमुख आणि गतिमान कारभार करण्यासाठी आमचे खंबीर नेतृत्व या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे.
गटनिहाय उमेदवारांची अधिकृत यादी :-
मुखेड गट: श्री. दिगंबर भानुदास गोपनर (आखरगा)
पाळा गट: श्री. आनंदराव हरिश्चंद्र शिंदे (केरूर)
बेटमोगरा गट: श्री. भीमराव मारोती दस्तुरे (हंगरगा)
सावरगाव गट: श्री. विजयकुमार त्र्यंबकराव मस्कले (सांगवी बे.)
राजुरा गट: सौ. अनुराधा गोविंदराव कदम (माकणी)
बाऱ्हाळी गट: श्री. शिवराम विठ्ठलराव पाटील (कुंद्राळा)
मुक्रमाबाद गट: श्री. व्यंकटराव तुकाराम वाडीकर (हाळणी)
एकलारा गट: श्री. रमेश धर्माजी पडलवार (एकलारा)
महिला राखीव: सौ. तेजाबाई जीवनराव शिंदे, सौ. लक्ष्मीबाई बालाजी पाटील, सौ. चिमणबाई नागोराव गवते
वैयक्तिक वर्ग: श्री. बळवंतराव माधवराव पाटील, श्री. बालाजी नागोराव गवते
व्ही.जे.एन.टी. प्रवर्ग: श्री. नागोराव हुलप्पा श्रीरामे
ओबीसी प्रवर्ग: श्री. जगन्नाथ नागनाथ तरगुडे
एस.सी. / एस.टी. प्रवर्ग: 2 जागा
शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी, तसेच सहकार क्षेत्र अधिक बळकट, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्यासाठी आमचा पॅनल पूर्णपणे कटिबद्ध आहे. निवडणूक रिंगणात उतरलेल्या सर्व 16 उमेदवारांना माझ्याकडून आणि पक्षाकडून विजयाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
यावेळी भाजप विधानसभा प्रमुख खुशालराव पाटील उमरदरीकर, लक्ष्मण पाटील खैरकेकर, बळवंत पाटील बेटमोगरेकर, व्यंकटराव लोहबंदे, दत्ता पाटील बेटमोगरेकर, नारायण पाटील सादगिरे, व्यंकटराव जाधव वसुरकर, बालाजी पाटील सकनूरकर यांच्यासह भाजपचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis