लातूर पोलीसांचा ‘पोलीस–विद्यार्थी संवाद’ उपक्रम; 25 दिवसांत 186 भेटी
लातूर, 25 ऑगस्ट, (हिं.स.)। विद्यार्थ्यांमध्ये कायद्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासोबतच त्यांच्याशी थेट संवाद साधून सुरक्षितता, सायबर गुन्हे, व्यसनमुक्ती, वाहतूक नियम, महिला व बालकांचे संरक्षण तसेच सोशल मीडियाचा सुरक्षित वापर याबाबत मार्गदर्शन करण्य
पोलीस विद्यार्थी संवाद


लातूर, 25 ऑगस्ट, (हिं.स.)। विद्यार्थ्यांमध्ये कायद्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासोबतच त्यांच्याशी थेट संवाद साधून सुरक्षितता, सायबर गुन्हे, व्यसनमुक्ती, वाहतूक नियम, महिला व बालकांचे संरक्षण तसेच सोशल मीडियाचा सुरक्षित वापर याबाबत मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने लातूर पोलीस विभागातर्फे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या संकल्पनेतून दि. 1 ऑगस्ट 2026 पासून ‘पोलीस–विद्यार्थी संवाद’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

दि. 24 ऑगस्ट 2026 पर्यंत या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील 23 पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकारी व दुय्यम अधिकाऱ्यांनी शाळा, महाविद्यालये व कोचिंग क्लासेसना एकूण 186 भेटी देत तब्बल 58527 विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला आहे. विद्यार्थ्यांनी मोकळेपणाने प्रश्न विचारावेत आणि पोलिसांशी सुसंवादाचे नाते निर्माण व्हावे, यासाठी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

या उपक्रमाची विशेष बाब म्हणजे पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी स्वतः चार ठिकाणी भेटी देऊन तब्बल 8700 विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेत विद्यार्थ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन करीत आहेत.

24 ऑगस्ट रोजी विविध ठिकाणी विद्यार्थ्यांशी संवाद.

दि. 24 ऑगस्ट रोजी पोलीस स्टेशन उदगीर शहर हद्दीमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी श्री भातलवंडे यांनी माउंट एलिफेरा जी स्कूल येथे तर पोलीस उपनिरीक्षक श्री केंद्रे यांनी कोनोळे कोचिंग क्लासेस येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

पोलीस स्टेशन गांधी चौक हद्दीमध्ये राजश्री शाहू महाविद्यालय लातूर या ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री साळवे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

पोलीस स्टेशन अहमदपूर हद्दीमध्ये रवींद्रनाथ टागोर विद्यालय तसेच मॉडेल इंग्लिश स्कूल या ठिकाणी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री केदसे यांनी मार्गदर्शन केले.

पोलीस स्टेशन साकुर हद्दीमध्ये जिल्हा परिषद शाळा गांजूर या ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक श्री नागरगोजे यांनी मार्गदर्शन केले.

पोलीस स्टेशन देऊनी हद्दीमध्ये जोगेश्वर विद्यालय या ठिकाणी पोलिस अंमलदार आगलावे यांनी मार्गदर्शन केले.

पोलीस स्टेशन औराद शहाजनी हद्दीमध्ये शिवाजीराव पाटील विद्यालय हलगरा या ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक श्री काळे यांनी मार्गदर्शन केले.

पोलीस स्टेशन किल्लारी यादीमध्ये उर्दू विद्यालय गुबाळ या ठिकाणी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री जाधव यांनी मार्गदर्शन केले.

पोलीस स्टेशन औसा हद्दीमध्ये मध्ये मुक्तेश्वर उच्च माध्यमिक विद्यालय या ठिकाणी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री घायवट यांनी मार्गदर्शन केले.

पोलीस स्टेशन एमआयडीसी नदीमध्ये शारदा इंटरनॅशनल स्कूल या ठिकाणी पोलीस निरीक्षक श्री चावरे यांनी मार्गदर्शन केले.

पोलीस स्टेशन शिवाजीनगर हद्दीमध्ये सुरत शहावली उर्दू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय या ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक श्री नागरगोजे यांनी मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षित भविष्यासाठी पोलीस आणि विद्यार्थी यांच्यातील संवाद अधिक दृढ करण्याचा हा उपक्रम यापुढेही सातत्याने राबविण्यात येणार असून, ‘सुरक्षित विद्यार्थी–सुरक्षित समाज’ या उद्देशाने लातूर पोलीस विभागाची जनजागृती मोहीम प्रभावीपणे सुरू राहणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande