
बीड, 25 ऑगस्ट, (हिं.स.)। बीड तालुक्यातील पिंपळगाव घाट ते पांढरेवाडी हा रस्ता खुला करण्याच्या मागणीसाठी श्री. महादेव तेलप यांच्यासह ग्रामस्थांनी १५ ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण केले होते. या पार्श्वभूमीवर आज आमदार संदीप क्षीरसागर यांनी ग्रामपंचायत कार्यालयाला भेट देत ग्रामस्थांशी संवाद साधला. यानंतर आमदार क्षीरसागर यांनी संबंधित रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी केली. रस्त्याचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. रस्ता खुला झाल्यास परिसरातील ग्रामस्थांची ये-जा आणि दळणवळणाची मोठी सोय होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis