धर्मवीर छ. संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी
छत्रपती संभाजीनगर, 25 ऑगस्ट (हिं.स.)। आमदार म्हणून निवड झाल्यानंतर फुलंब्रीच्या विकासाशी संबंधित महत्त्वाच्या विषयाला प्राधान्य देत, आज मंत्रालयात सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. यावेळी या विषया
Q


छत्रपती संभाजीनगर, 25 ऑगस्ट (हिं.स.)। आमदार म्हणून निवड झाल्यानंतर फुलंब्रीच्या विकासाशी संबंधित महत्त्वाच्या विषयाला प्राधान्य देत, आज मंत्रालयात सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. यावेळी या विषयावर मंत्री महोदयांसोबत सकारात्मक चर्चा झाली.

फुलंब्री येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासकीय विश्रामगृहाच्या परिसरात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे केली आहे.

फुलंब्री शहर हे छत्रपती संभाजीनगर–जळगाव या प्रमुख राष्ट्रीय मार्गावर असून, येथून जागतिक वारसा स्थळ असलेल्या अजिंठा लेण्यांकडे देश-विदेशातील मोठ्या संख्येने पर्यटक प्रवास करतात. त्यामुळे या ठिकाणी उभारण्यात येणारा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा पर्यटकांसाठी प्रेरणास्थान ठरेल. तसेच महाराष्ट्राच्या समृद्ध इतिहासाची आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाची माहिती व्यापक स्तरावर पोहोचण्यास मदत होईल.

शासकीय विश्रामगृहाच्या परिसरातील उपलब्ध जागेचा योग्य उपयोग होऊन या ठिकाणाचे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्व अधिक वाढेल. तसेच स्थानिक नागरिकांमध्ये अभिमानाची भावना निर्माण होईल आणि भावी पिढ्यांना छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्याची प्रेरणा मिळेल.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande