
नांदेड, 25 ऑगस्ट (हिं.स.)। भारतीय जनता पक्षाचे मुखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर तुषार राठोड यांनी पवित्र श्रावणमासानिमित्त मुखेड नगरीचे ग्रामदैवत परमपूज्य श्री वीरभद्र स्वामी महाराजांचे मनोभावे दर्शन घेतले आणि महाआरतीचा लाभ घेतला. यावेळी मंदिराच्या सुरू असलेल्या भव्य नूतनीकरण व बांधकाम कामाची सविस्तर पाहणी केली.
मंदिराचे बांधकाम आता अंतिम टप्प्यात आले असून, लवकरच आपल्या सर्वांच्या स्वप्नातील एक भव्य आणि देखणे मंदिर साकारणार आहे.
या प्रसंगी भाजप विधानसभा प्रमुख खुशालराव पाटील उमरदरीकर, माजी जिल्हा परिषद सदस्य संतोष बोनलेवाड, डॉ. रणजित काळे, नगरसेवक विनोद दंडलवाड, भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष करण रोडगे, नगरसेवक हारून होनवडजकर, बाळू नाईक जुन्नेकर, गजानन अकुलवाड, सचिन चव्हाण आणि इतर सर्व सहकारी, पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis