पुणे-पिंपरीत गॅसपुरवठा अधिक सक्षम होणार
जुलै २०२७ पर्यंत ६५ किमी पाइपलाइन पूर्ण होणार पुणे, 25 ऑगस्ट (हिं.स.)। पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील नैसर्गिक वायू पुरवठा अधिक सक्षम आणि सुरक्षित करण्यासाठी महाराष्ट्र नॅशनल गॅस लिमिटेडने (एमएनजीएल) ६५ किलोमीटर लांबीच्या स्टील ट्रंक पाइपलाइन प्रक
cng


जुलै २०२७ पर्यंत ६५ किमी पाइपलाइन पूर्ण होणार

पुणे, 25 ऑगस्ट (हिं.स.)। पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील नैसर्गिक वायू पुरवठा अधिक सक्षम आणि सुरक्षित करण्यासाठी महाराष्ट्र नॅशनल गॅस लिमिटेडने (एमएनजीएल) ६५ किलोमीटर लांबीच्या स्टील ट्रंक पाइपलाइन प्रकल्पाला सुरुवात केली आहे. या पाइपलाइनमुळे शहराला नैसर्गिक वायूचा अतिरिक्त आणि पर्यायी स्रोत उपलब्ध होणार असून, वाढत्या सीएनजी आणि पीएनजी ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यास मदत होणार आहे. हा प्रकल्प जुलै २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

सध्या पुणे आणि पिंपरी-चिंचवडला चिखली आणि तळेगाव येथील सिटी गेट स्टेशनच्या माध्यमातून नैसर्गिक वायूचा पुरवठा केला जातो. हा पुरवठा प्रामुख्याने गेलच्या दहेज-उरण-दाभोळ-पनवेल पाइपलाइन नेटवर्कवर अवलंबून आहे. वाढती मागणी लक्षात घेता या व्यवस्थेवर ताण येतअसल्यानेएमएनजीएलनेइंडियन ऑइलच्या ईस्ट-वेस्ट पाइपलाइन (EWPL) नेटवर्कशी जोडणीकरण्याचा निर्णय घेतला आहे.नवीन स्टील ट्रंक पाइपलाइनमुळे पुणे-पिंपरी शहराला गॅसपुरवठ्याचादुसरा मार्गउपलब्ध होणार आहे. त्यामुळे वितरणजाळ्याचीक्षमतावाढण्याबरोबरचपुरवठ्यातील अडथळ्यांचा धोका कमी होईल. ग्राहकांना अधिक सुरक्षित आणि अखंडित गॅसपुरवठा मिळण्याची अपेक्षा आहे. खासगी कर्मचारी, व्यावसायिक, शालेय वाहतूक करणारे चालक आणि रिक्षाचालक यांना त्याचा सर्वाधिक फटका बसत आहे. नवीन पाइपलाइन झाल्यानंतर कमी दाबाची समस्याही मिटणार आहे, अशी माहिती एमएनजीएलकडून देण्यात आली. ---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande