छ. संभाजीनगर रेल्वे स्थानकाचे काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करा; भुमरेंच्या अधिकाऱ्यांना सूचना
छत्रपती संभाजीनगर, 25 ऑगस्ट, (हिं.स.) - खासदार संदिपान भुमरे यांनी छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकातील सुरू असलेल्या पुनर्विकास कामांचा सविस्तर आढावा घेतला. मुख्य इमारत, प्रवेशद्वार, प्लॅटफॉर्म, १६ डब्यांची पिटलाईन, लिफ्ट व एस्केलेटर, पार्किंग व्यव
अ


छत्रपती संभाजीनगर, 25 ऑगस्ट, (हिं.स.) - खासदार संदिपान भुमरे यांनी छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकातील सुरू असलेल्या पुनर्विकास कामांचा सविस्तर आढावा घेतला. मुख्य इमारत, प्रवेशद्वार, प्लॅटफॉर्म, १६ डब्यांची पिटलाईन, लिफ्ट व एस्केलेटर, पार्किंग व्यवस्था, रस्ते, ड्रेनेज, इलेक्ट्रिकल तसेच सौरऊर्जेशी संबंधित कामांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. यासोबतच मंजूर आराखडा व अंदाजपत्रकानुसार कामकाज सुरू आहे का, गुणवत्तेचे निकष पाळले जात आहेत का आणि प्रलंबित कामांची सद्यस्थिती काय आहे, याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली. प्रत्येक काम दर्जेदार पद्धतीने आणि निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

प्रवाशांच्या सोयी-सुविधांनाही प्राधान्य देण्यात येत असून, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांसाठीच्या सुविधा, स्वच्छता, पिण्याचे पाणी, CCTV आणि सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. तसेच शिवाजीनगर भुयारी मार्गात पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या पाणी साचण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याबाबतही चर्चा झाली. तसेच रोटेगाव, परसोडा आणि करंजगाव रेल्वे स्थानकांवरील प्रवासी सुविधा व सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांवर भर देण्यात आला.

छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास हा शहराच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रकल्प आहे. आधुनिक, सुरक्षित आणि दर्जेदार सुविधा प्रवाशांना उपलब्ध करून देण्यासाठी प्रलंबित कामांना गती देत ती वेळेत पूर्ण करण्यावर विशेष भर दिला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande