डेक्कन क्वीन पुन्हा प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरून चालवा; मुरलीधर मोहोळांची रेल्वे प्रशासनाकडे मागणी
पुणे, 25 ऑगस्ट, (हिं.स.)। पुणे आणि मुंबई या दोन प्रमुख शहरांना जोडणारी ऐतिहासिक डेक्कन क्वीन एक्स्प्रेस पुन्हा पुणे रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरून चालवावी, अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली.
railway sation

विभागीय रेल्वे समितीच्या बैठकीत त्यांनी याबाबत प्रशासनाला सूचना दिल्या. डेक्कन क्वीन ही पुणे-मुंबई प्रवासाचीजीवनवाहिनी आणि पुण्याची ऐतिहासिक ओळखअसल्याचे मोहोळ यांनी सांगितले. प्रवाशांची सोय लक्षात घेता ही गाडी पुन्हा प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरून चालविण्याबाबत रेल्वे प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, डेक्कन क्वीनच्या प्रसिद्धडायनिंग कारच्या दर्जाबाबतहीमोहोळ यांनी रेल्वे अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. एकेकाळी या डायनिंग कारमधील खाद्यपदार्थांना विशेष प्रतिष्ठा होती. मात्र, अलीकडच्या काळात अन्नाचा दर्जा, चव आणि सेवेबाबत प्रवाशांकडून तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे डायनिंग कारमधील खाद्यपदार्थ आणि सेवेचा दर्जा सुधारण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी रेल्वे प्रशासनाला दिल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु

 rajesh pande