श्री क्षेत्र राजूर गणपती येथील महिला सेवेकरींचा अयोध्या दर्शनाचा शुभारंभ
छत्रपती संभाजीनगर, 25 ऑगस्ट, (हिं.स.)। श्री क्षेत्र राजूर गणपती येथे गेल्या अनेक वर्षांपासून महिला सेवेकरी भक्तिभावाने सेवा देत आहेत. त्यांच्या या निस्वार्थ सेवाभावाची दखल घेत मंदिर संस्थानच्या वतीने या महिला सेवेकरींना राजूर गणपती ते अयोध्या दर्शन
अ


छत्रपती संभाजीनगर, 25 ऑगस्ट, (हिं.स.)। श्री क्षेत्र राजूर गणपती येथे गेल्या अनेक वर्षांपासून महिला सेवेकरी भक्तिभावाने सेवा देत आहेत. त्यांच्या या निस्वार्थ सेवाभावाची दखल घेत मंदिर संस्थानच्या वतीने या महिला सेवेकरींना राजूर गणपती ते अयोध्या दर्शन घडवून आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत आतापर्यंत १०१ महिला सेवेकरींना अयोध्या दर्शनाचा लाभ मिळणार असून, दर महिन्याला दोन ते तीन महिला सेवेकरींचा एक ग्रुप अयोध्या दर्शनासाठी रवाना होणार आहे.

आज पहिल्या महिला सेवेकरींच्या ग्रुपला प्रवासाच्या व अयोध्या दर्शनाच्या भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी मनःपूर्वक शुभेच्छा देऊन रवाना करण्यात आले. यावेळी मंदिर संस्थानचे सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande