फायर-बोल्टचे स्मार्टफोन क्षेत्रात पदार्पण; बोल्ट एइस ५जी आणि बोल्ट इव्हो भारतात दाखल
मुंबई, 26 ऑगस्ट (हिं.स.)। स्मार्टवॉच आणि वेअरेबल उत्पादनांसाठी ओळखल्या जाणाऱ्या फायर-बोल्टने आता स्मार्टफोन बाजारातही प्रवेश केला आहे. कंपनीने आपल्या बोल्ट या सब-ब्रँडअंतर्गत बोल्ट एइस ५जी आणि बोल्ट इव्हो हे दोन नवीन स्मार्टफोन भारतात लाँच केले आहे
Fire-Boltt Enters Smartphone Market; Bolt Ace 5G Bolt Evo Launched


Fire-Boltt Enters Smartphone Market; Bolt Ace 5G Bolt Evo Launched


मुंबई, 26 ऑगस्ट (हिं.स.)। स्मार्टवॉच आणि वेअरेबल उत्पादनांसाठी ओळखल्या जाणाऱ्या फायर-बोल्टने आता स्मार्टफोन बाजारातही प्रवेश केला आहे. कंपनीने आपल्या बोल्ट या सब-ब्रँडअंतर्गत बोल्ट एइस ५जी आणि बोल्ट इव्हो हे दोन नवीन स्मार्टफोन भारतात लाँच केले आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन १ सप्टेंबरपासून फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध होणार असून, पहिल्याच दिवशी कंपनीकडून प्रत्येक व्हेरिएंटवर १ हजार रुपयांची सवलत दिली जाणार आहे.

दोन्ही स्मार्टफोनमध्ये ६.७९ इंचाची एचडी प्लस एलसीडी स्क्रीन देण्यात आली आहे. या डिस्प्लेचे रिझोल्यूशन ७२० बाय १६४० पिक्सेल असून, १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि ६०० निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस मिळतो. दोन्ही फोन ड्युअल सिम सपोर्टसह येतात आणि अँड्रॉइड १६ वर आधारित ऑपरेटिंग सिस्टमवर चालतात. बोल्ट एइस ५जीमध्ये ऑक्टा-कोअर युनिसॉक टी८२०० चिपसेट देण्यात आला आहे. हा फोन ४ जीबी, ६ जीबी आणि ८ जीबी रॅम पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. स्टोरेजसाठी ६४ जीबी आणि १२८ जीबी पर्याय असून, मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज १ टीबीपर्यंत वाढवता येते. कंपनीच्या दाव्यानुसार या फोनने अँटुटू बेंचमार्कवर ५ लाख ४७ हजारांहून अधिक गुण मिळवले आहेत. तर बोल्ट इव्होमध्ये युनिसॉक टी७२५० चिपसेट असून, ४ जीबी आणि ६ जीबी रॅमचे पर्याय मिळतात. या फोनमध्ये ६४ जीबी आणि १२८ जीबी स्टोरेज उपलब्ध असून तेही १ टीबीपर्यंत वाढवता येते. कंपनीनुसार या फोनने अँटुटूवर ३ लाख ९० हजारांहून अधिक गुण मिळवले आहेत.

कॅमेऱ्याच्या बाबतीत एइस ५जीमध्ये ६४ मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा आणि अतिरिक्त कॅमेरा देण्यात आला आहे. इव्होमध्ये ५० मेगापिक्सेल मुख्य कॅमेऱ्यासोबत २ मेगापिक्सेल मॅक्रो कॅमेरा आहे. दोन्ही फोनमध्ये सेल्फीसाठी ८ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. दोन्ही मॉडेलमध्ये ६००० एमएएच क्षमतेची बॅटरी असून, एइस ५जीमध्ये १८ वॅट वायर्ड फास्ट चार्जिंगची सुविधा आहे. किंमतीचा विचार करता, बोल्ट एइस ५जीची सुरुवातीची किंमत १३,९९९ रुपये आहे. ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत १४,९९९ रुपये, तर ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत १५,९९९ रुपये आहे. बोल्ट इव्होची सुरुवातीची किंमत १०,९९९ रुपये असून, ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज मॉडेल ११,९९९ रुपयांना मिळेल. एइस ५जी सहा, तर इव्हो पाच रंगांमध्ये उपलब्ध होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande