पर्पल स्टाइल लॅब्स लिमिटेडचा आयपीओ 31 ऑगस्टला होणार खुला
मुंबई, 26 ऑगस्ट (हिं.स.) - पर्पल स्टाइल लॅब्स लिमिटेड (“कंपनी”) आपल्या इक्विटी शेअर्सची प्राथमिक समभाग विक्री सोमवार 31 ऑगस्ट 2026 रोजी खुली करणार आहे. प्रति इक्विटी शेअर 546 रु. ते 575 रु. किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. (“Price Band”). बोली क
Purple Style Labs Limited


मुंबई, 26 ऑगस्ट (हिं.स.) - पर्पल स्टाइल लॅब्स लिमिटेड (“कंपनी”) आपल्या इक्विटी शेअर्सची प्राथमिक समभाग विक्री सोमवार 31 ऑगस्ट 2026 रोजी खुली करणार आहे. प्रति इक्विटी शेअर 546 रु. ते 575 रु. किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. (“Price Band”). बोली किमान 26 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 26 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल. (“Minimum Bid Lot”). प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोली/ऑफर साठीचा दिनांक शुक्रवार, 28 ऑगस्ट 2026 आहे. बोली/ऑफर सोमवार, 31 ऑगस्ट 2026 रोजी खुली होईल. या ऑफरमध्ये प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्य असलेल्या 680 कोटी रु. पर्यतच्या इक्विटी शेअर्सचा संपूर्णपणे फ्रेश इश्यू समाविष्ट आहे.

24 ऑगस्ट 2026 रोजीच्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसद्वारे, 25 ऑगस्ट 2026 रोजीच्या दुरुस्तीपत्रासह (“रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस” किंवा “RHP”) जारी करण्यात येणारे इक्विटी शेअर्स स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे. इश्यूच्या उद्देशासाठी, नियुक्त स्टॉक एक्स्चेंज म्हणून NSE असेल. अॅक्सिस कॅपिटल लिमिटेड आणि आयआयएफएल कॅपिटल सर्व्हिसेस लिमिटेड (यापूर्वीचे आयआयएफएल सिक्युरिटीज लिमिटेड या नावाने ओळखली जाणारी) हे या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत. 25 ऑगस्ट 2026 रोजीच्या सविस्तर किंमतपट्टा जाहिरातीचे प्रकाशन 26 ऑगस्ट 2026 रोजी फायनान्शियल एक्स्प्रेस या इंग्रजी राष्ट्रीय दैनिकाच्या सर्व आवृत्त्यांमध्ये, जनसत्ता या हिंदी राष्ट्रीय दैनिकाच्या सर्व आवृत्त्यांमध्ये आणि नवशक्ती या मराठी दैनिकाच्या मुंबई आवृत्तीत करण्यात आले आहे.

ही ऑफर SCRR, च्या नियम 19(2)(b) आणि SEBI ICDR नियम 31 च्या अनुषंगाने केली जात आहे. ही ऑफर बुक बिल्डिंग प्रक्रियेच्या माध्यमातून केली जात असून, SEBI ICDR सुधारित नियम 6(2) च्या नियमनात आहे. त्या अंतर्गत SEBI ICDR नियमांनुसार, ऑफरच्या किमान 75% भाग पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (“QIBs” आणि तो हिस्सा “QIB Portion”) प्रमाणबद्ध वाटपासाठी उपलब्ध असेल. तथापि आपली कंपनी, BRLMs सोबत सल्लामसलत करून, SEBI ICDR नियमांनुसार विवेकाधीन आधारावर QIB Portion पैकी 60% पर्यंत हिस्सा प्रमुख गुंतवणूकदारांसाठी (“Anchor Investor Portion”) वाटप करू शकते. यापैकी 40% हिस्सा पुढीलप्रमाणे राखीव ठेवला जाईल: (i) 33.33% देशांतर्गत म्युच्युअल फंड्ससाठी आणि (ii) 6.67% जीवन विमा कंपन्या आणि पेन्शन फंड्ससाठी, परंतु अट अशी की SEBI ICDR नियमांनुसार देशांतर्गत म्युच्युअल फंड्स, जीवन विमा कंपन्या आणि पेन्शन फंड्सकडून प्रमुख गुंतवणूकदारांना इक्विटी शेअर्स वाटप करण्यात येणाऱ्या किमतीइतक्या किंवा त्याहून जास्त किमतीवर वैध बोली प्राप्त झालेल्या असाव्यात. (यास “अँकर गुंतवणूकदार वाटप किंमत” असे संबोधले जाईल).

वरील कलम (ii) मध्ये नमूद केलेल्या राखीव श्रेणीमध्ये कमी सदस्यता (under-subscription) झाल्यास, तो हिस्सा देशांतर्गत म्युच्युअल फंड्सना वाटप केला जाऊ शकतो. अँकर गुंतवणूकदार हिस्स्यामध्ये अपुरी सदस्यता किंवा वाटप न झाल्यास उर्वरित इक्विटी शेअर्स नेट QIB हिस्स्यामध्ये (प्रमुख गुंतवणुकदार हिस्सा वगळून) जोडले जातील. (the “Net QIB Portion”).

ऑफर प्राईस इतक्या किंवा त्याहून अधिक किमतीला बोली मिळाल्यास QIB च्या एकूण हिश्शापैकी 5 % फक्त म्युच्युअल फंडांना वाटपासाठी उपलब्ध असतील आणि QIBचा उर्वरित हिस्सा म्युच्युअल फंडांसह अन्य सर्व QIB बोलीधारकांसाठी (प्रमुख गुंतवणुकदार वगळून) उपलब्ध करून दिला जाईल. तथापि, जर म्युच्युअल फंडांकडून एकूण मागणी नेट QIB Portion च्या 5% पेक्षा कमी असेल, तर म्युच्युअल फंड भागात वाटपासाठी उपलब्ध असलेले उर्वरित इक्विटी शेअर्स उरलेल्या Net QIB Portion मध्ये समाविष्ट करून QIBs साठी प्रमाणात वाटप केले जाईल.

पुढे, ऑफर पैकी 15% पेक्षा जास्त नसलेला हिस्सा बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असेल. बिगर संस्थात्मक भागापैकी (अ)एक तृतीयांश भाग 0.20 दशलक्ष रु. पेक्षा अधिक आणि 1.00 दशलक्ष रु. पर्यंत पर्यंत अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल आणि (ब)दोन तृतीयांश भाग 1.00 दशलक्ष रु.पेक्षा अधिक अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल. अर्थात त्यासाठी अशा कोणत्याही उप-श्रेणीतील सबस्क्राईब नसलेला भाग बिगर-संस्थात्मक बोली लावणाऱ्या दुसऱ्या उप-श्रेणीतील अर्जदारांना सेबी आयसीडीआर निर्देशांनुसार वाटप केला जाऊ शकतो. ऑफर प्राईस इतक्या किंवा त्याहून अधिक किमतीला बोली मिळाल्यास हे लागू होईल. तसेच, इश्यूच्या 10% पेक्षा जास्त नसलेला हिस्सा रिटेल वैयक्तिक बोलीदारांसाठी (“RIBs”) सेबी आयसीडीआर नियमावलीनुसार (“Retail Portion”) उपलब्ध असेल, त्यासाठी त्यांच्याकडून ऑफर किमतीएवढ्या किंवा त्यापेक्षा जास्त किमतीवर वैध बोली प्राप्त होणे आवश्यक आहे.

प्रमुख गुंतवणूकदारांखेरीज (except Anchor Investors) सर्व संभाव्य गुंतवणूकदारांनी आपापल्या ASBA खात्यांचा तपशील आणि यूपीआय अर्जदारांसाठी यूपीआय आयडीसह जाहीर करून अर्जाची विहित रक्कम अॅप्लीकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक अमाऊंट (“ASBA”) प्रक्रियेद्वारे करून ठेवणे बंधनकारक आहे. त्यानुसार योजनेत सहभागी करून घेण्यासाठी सर्व बोली रकमा या सेल्फ सर्टिफाइड सिंडिकेट बँक्स एससीएसबीतर्फे किंवा यूपीआय यंत्रणे अंतर्गत स्पॉन्सर बँकेतर्फे ब्लॉक करून ठेवण्यात येतील. प्रमुख गुंतवणूकदारांना त्यांच्यासाठीच्या हिश्शात “ASBA” प्रक्रीयेनुसार सहभागी होण्याची परवानगी नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande