आयसीएटीने 15 मीटर लांबीच्या मल्टी-ॲक्सल स्लीपर बससाठी अनुपालन प्रमाणपत्र केले जारी
नवी दिल्ली, 26 ऑगस्ट (हिं.स.)। आंतरराष्ट्रीय वाहन तंत्रज्ञान केंद्राने (आयसीएटी) केंद्रीय मोटर वाहन नियमांमधील लागू तरतुदींनुसार, मोटारवाहन उद्योग क्षेत्रासाठीच्या मानक क्र. 119 आणि 153 अंतर्गत (AIS-119 आणि AIS-153) 15 मीटर लांबीच्या मल्टी-ॲक्सल शय
ICAT COMP CERTIF15 METER BUS


नवी दिल्ली, 26 ऑगस्ट (हिं.स.)। आंतरराष्ट्रीय वाहन तंत्रज्ञान केंद्राने (आयसीएटी) केंद्रीय मोटर वाहन नियमांमधील लागू तरतुदींनुसार, मोटारवाहन उद्योग क्षेत्रासाठीच्या मानक क्र. 119 आणि 153 अंतर्गत (AIS-119 आणि AIS-153) 15 मीटर लांबीच्या मल्टी-ॲक्सल शयनयान बससाठी आपले पहिले अनुपालन प्रमाणपत्र जारी केले आहे. भारतातील प्रवासी वाहतूक क्षेत्रासाठी ही एक महत्त्वाची घडामोड ठरली आहे.

सिनाटी ऑटोमोटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची निर्मिती असलेल्या, त्यांच्या 15 मीटर लांबीच्या बहु-अक्षीय शयनयान बससाठी हे प्रमाणपत्र देण्यात आले आहे. या यशामुळे प्रवासी वाहतूक श्रेणीत मान्यता देण्यायोग्य एका सर्वात लांब बसच्या संरचनेची चाचणी आणि प्रमाणीकरणातील एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला आहे. हे वाहन लांब पल्ल्याच्या प्रवासी वाहतुकीसाठी तयार करण्यात आले असून. या बसच्या निर्मितीत वाहनाची भक्कम रचना, आपत्कालीन परिस्थितीतील सुरक्षा, आगीपासून संरक्षण, प्रवाशांचा सुलभ वावर आणि आरामदायी प्रवास या वैशिष्ट्यांवर विशेष भर देण्यात आला आहे. या बसमध्ये झोपून प्रवास करण्यासाठी 42 आसनांची सोय आहे, तर बसच्या दुसऱ्या संमीश्र सुविधेच्या प्रकारात झोपण्याची 21 आणि बसण्याची 42 आसने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी एकात्मिक सुविधांचा पर्याय उपलब्ध झाला आहे. मोटारवाहन क्षेत्रासाठी ठरवून दिलेली मानके आणि केंद्रीय मोटर वाहन नियमांनुसार वाहनाची सुरक्षितता, वाहनाची मजबुती आणि प्रवाशांची सुलभता आणि आरामदायीपणा या सर्व आवश्यक निकषांवर या बसची चाचणी आणि प्रमाणीकरण करण्यात आले आहे.मोटारवाहन उद्योग क्षेत्रासाठीच्या मानक क्र. 119 आणि 153 अंतर्गत झालेल्या या प्रमाणीकरणातून, प्रगत प्रवासी वाहनांच्या संरचनेचे मूल्यमापन करण्याची तसेच, उत्पादकांना तांत्रिक निकष पूर्ण करण्यात पाठबळ पुरवण्याच्या आंतरराष्ट्रीय वाहन तंत्रज्ञान केंद्राच्या क्षमतेची प्रचिती येते.

यानिमीत्ताने झालेल्या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय वाहन तंत्रज्ञान केंद्राचे संचालक सौरभ दलेला यांनी उपस्थितांसोबत संवाद साधला. हे प्रमाणीकरण आंतरराष्ट्रीय वाहन तंत्रज्ञान केंद्रासाठी एक मोठे यश आहे, तसेच यातून प्रगत प्रवासी वाहनांची चाचणी आणि प्रमाणीकरण करण्याच्या बाबतीतील संस्थेच्या तांत्रिक क्षमतेचीही प्रचिती येते असे त्यांनी सांगितले. या प्रमाणीकरणातून प्रवासी सुरक्षा, नियमांचे पालन आणि तंत्रज्ञानातील प्रगतीबाबत केंद्राची वचनबद्धताही अधिक दृढ झाली असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली. अधिक सुरक्षित, विश्वासार्ह आणि प्रगत तंत्रज्ञान युक्त वाहने विकसित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय वाहन तंत्रज्ञान केंद्र भारतीय वाहन निर्मिती क्षेत्राला सातत्याने पाठबळ देत राहील अशी ग्वाही देखील त्यांनी दिली. हे प्रमाणीकरण म्हणजे देशातील अधिक सुरक्षित आणि प्रगत प्रवासी वाहतूक वाहनांच्या विकासासाठी आंतरराष्ट्रीय वाहन तंत्रज्ञान केंद्र देत असलेल्या योगदानामधील आणखी एक महत्त्वाचे पाऊल ठरले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande