सराफा बाजारात कोणताही बदल नाही; सोने आणि चांदी स्थिर
नवी दिल्ली, २७ ऑगस्ट (हि.स.)। सराफा बाजारात आज सुरुवातीच्या व्यवहारादरम्यान कोणताही बदल झालेला नाही. सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंचे दर आजही बुधवारच्या पातळीवरच स्थिर असून, सुरुवातीच्या व्यवहारात त्याच दराने व्यवहार होताना दिसत आहेत. दर
सोने-चांदी लोगो


नवी दिल्ली, २७ ऑगस्ट (हि.स.)। सराफा बाजारात आज सुरुवातीच्या व्यवहारादरम्यान कोणताही बदल झालेला नाही. सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंचे दर आजही बुधवारच्या पातळीवरच स्थिर असून, सुरुवातीच्या व्यवहारात त्याच दराने व्यवहार होताना दिसत आहेत.

दरात कोणताही बदल न झाल्यामुळे देशातील बहुतांश सराफा बाजारांमध्ये आज २४ कॅरेट सोन्याचा दर १,६३,७४० रुपये ते १,६३,८९० रुपये प्रति १० ग्रॅम दरम्यान आहे. त्याचप्रमाणे २२ कॅरेट सोन्याचा दर देखील बुधवारीच्या पातळीवरच असून, तो १,५०,०९० रुपये ते १,५०,२४० रुपये प्रति १० ग्रॅम दरम्यान आहे. चांदीच्या दरात सलग चौथ्या दिवशी कोणताही बदल झालेला नसल्याने दिल्ली सराफा बाजारात आजही चांदी २,५९,९०० रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे.

दिल्लीमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर आज १,६३,८९० रुपये प्रति १० ग्रॅम, तर २२ कॅरेट सोन्याचा दर १,५०,२४० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये २४ कॅरेट सोने १,६३,७४० रुपये प्रति १० ग्रॅम आणि २२ कॅरेट सोने १,५०,०९० रुपये प्रति १० ग्रॅम दराने विकले जात आहे. त्याचप्रमाणे अहमदाबादमध्ये २४ कॅरेट सोन्याचा किरकोळ दर १,६३,७९० रुपये प्रति १० ग्रॅम, तर २२ कॅरेट सोन्याचा दर १,५०,१४० रुपये प्रति १० ग्रॅम नोंदवला गेला आहे.

या प्रमुख शहरांव्यतिरिक्त चेन्नईमध्ये २४ कॅरेट सोने आज १,६३,७४० रुपये प्रति १० ग्रॅम आणि २२ कॅरेट सोने १,५०,०९० रुपये प्रति १० ग्रॅम दराने विकले जात आहे. त्याचप्रमाणे कोलकात्यामध्ये २४ कॅरेट सोने १,६३,७४० रुपये प्रति १० ग्रॅम आणि २२ कॅरेट सोने १,५०,०९० रुपये प्रति १० ग्रॅम दराने व्यवहार करत आहे. भोपाळमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर १,६३,७९० रुपये प्रति १० ग्रॅम, तर २२ कॅरेट सोने १,५०,१४० रुपये प्रति १० ग्रॅम दराने विकले जात आहे.

जयपूरमध्ये २४ कॅरेट सोने १,६३,८९० रुपये प्रति १० ग्रॅम आणि २२ कॅरेट सोने १,५०,२४० रुपये प्रति १० ग्रॅम दराने विकले जात आहे. पाटणामध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर १,६३,७९० रुपये प्रति १० ग्रॅम, तर २२ कॅरेट सोन्याचा दर १,५०,१४० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. लखनौच्या सराफा बाजारात आज २४ कॅरेट सोने १,६३,८९० रुपये प्रति १० ग्रॅम आणि २२ कॅरेट सोने १,५०,२४० रुपये प्रति १० ग्रॅम दराने विकले जात आहे.

देशातील इतर राज्यांप्रमाणेच कर्नाटक, तेलंगणा आणि ओडिशा येथील सराफा बाजारातही आज सुरुवातीच्या व्यवहारादरम्यान सोन्याच्या दरात कोणताही बदल झालेला दिसत नाही. या तीन राज्यांच्या राजधानी बेंगळुरू, हैदराबाद आणि भुवनेश्वर येथे २४ कॅरेट सोन्याचा दर १,६३,७४० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. त्याचप्रमाणे या तिन्ही शहरांतील सराफा बाजारांमध्ये २२ कॅरेट सोने १,५०,०९० रुपये प्रति १० ग्रॅम दराने विकले जात आहे.------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande