भारताचा पूरग्रस्त नेपाळला मदतीचा हात
नवी दिल्ली, २७ ऑगस्ट (हिं.स.)भारताने आपत्तीग्रस्त नेपाळला ३७.५ टन एचएडीआर साहित्य, औषधे आणि अन्न पाकिटांची दुसरी खेप पाठवली. परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी ट्विटरवर लिहिले, ३७.५ टन एचएडीआर साहित्य, औषधे आणि अन्न पाकिटे घेऊन जाणारे दुसरे वि
भारताचा पूरग्रस्त नेपाळला मदतीचा हात


नवी दिल्ली, २७ ऑगस्ट (हिं.स.)भारताने आपत्तीग्रस्त नेपाळला ३७.५ टन एचएडीआर साहित्य, औषधे आणि अन्न पाकिटांची दुसरी खेप पाठवली. परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी ट्विटरवर लिहिले, ३७.५ टन एचएडीआर साहित्य, औषधे आणि अन्न पाकिटे घेऊन जाणारे दुसरे विमान नेपाळसाठी नुकतेच रवाना झाले आहे. भारत नेपाळी अधिकाऱ्यांच्या सतत आणि जवळच्या संपर्कात आहे. आम्ही मदतकार्यात आमचे पूर्ण सहकार्य सुरू ठेवू.

बुधवारी सकाळी नेपाळमधील रसुवा आणि आसपासच्या भागातील भोटेकोशी नदीला आलेल्या विनाशकारी पुरात किमान १५७ लोकांचा मृत्यू झाला असून जवळपास ७०० जण बेपत्ता आहेत. बेपत्ता झालेल्यांमध्ये परदेशी नागरिक आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या पुरामुळे तीन जिल्ह्यांमध्ये हाहाकार माजला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande