सुरुवातीच्या व्यवहारात शेअर बाजारावर दबाव; सेन्सेक्स आणि निफ्टी घसरले
नवी दिल्ली, २७ ऑगस्ट (हि.स.)। देशांतर्गत शेअर बाजारात आज सुरुवातीच्या व्यवहारादरम्यान दबाव कायम असल्याचे दिसून येत आहे. आजच्या व्यवहाराची सुरुवात मात्र मजबुतीने झाली होती. बाजार उघडल्यानंतर खरेदीला मिळालेल्या पाठिंब्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टी या द
शेअर बजार लोगो


नवी दिल्ली, २७ ऑगस्ट (हि.स.)। देशांतर्गत शेअर बाजारात आज सुरुवातीच्या व्यवहारादरम्यान दबाव कायम असल्याचे दिसून येत आहे. आजच्या व्यवहाराची सुरुवात मात्र मजबुतीने झाली होती. बाजार उघडल्यानंतर खरेदीला मिळालेल्या पाठिंब्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांच्या हालचालींमध्ये सुरुवातीला काहीशी तेजी दिसून आली. मात्र, ही तेजी टिकू शकली नाही. काही वेळातच बाजारात विक्रीचा दबाव निर्माण झाला आणि दोन्ही निर्देशांक घसरणीस लागले. बाजारात सुरू असलेल्या खरेदी-विक्रीच्या चढ-उतारादरम्यान सुरुवातीच्या एका तासाच्या व्यवहारानंतर सेन्सेक्स ०.१५ टक्के आणि निफ्टी ०.०७ टक्क्यांच्या कमजोरीसह व्यवहार करत होते.

बीएसई सेन्सेक्स आज १०३.८२ अंक म्हणजेच ०.१३ टक्क्यांच्या वाढीसह ७७,५७६.७६ अंकांच्या पातळीवर खुला झाला. व्यवहार सुरू होताच खरेदीच्या पाठिंब्यामुळे हा निर्देशांक प्रारंभिक पातळीपासून सुमारे १२० अंकांनी वाढून ७७,६९४.९७ अंकांपर्यंत पोहोचला. त्यानंतर बाजारात विक्री सुरू झाली. विक्रीच्या दबावामुळे सेन्सेक्सने अल्पावधीतच आपली संपूर्ण सुरुवातीची वाढ गमावली. बाजारातील सततच्या खरेदी-विक्रीदरम्यान सुरुवातीच्या एका तासाचा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर सकाळी १०:१५ वाजता सेन्सेक्स ११२.७० अंक म्हणजेच ०.१५ टक्क्यांनी घसरून ७७,३६०.२४ अंकांवर व्यवहार करत होता.

सेन्सेक्सप्रमाणेच एनएसई निफ्टीनेही आज ६९.८५ अंक म्हणजेच ०.२९ टक्क्यांच्या वाढीसह २४,२७७.६० अंकांच्या पातळीवर व्यवहाराची सुरुवात केली. बाजार उघडल्यानंतर खरेदीच्या पाठिंब्यामुळे पहिल्याच मिनिटात हा निर्देशांक सुमारे ९० अंकांनी वाढून २४,२९७.४५ अंकांच्या पातळीवर पोहोचला. मात्र, निफ्टीची ही तेजीही टिकू शकली नाही. काही वेळातच नफावसुलीमुळे बाजारात विक्रीचा दबाव निर्माण झाला आणि निफ्टी लाल निशाणावर घसरला. बाजारात सुरू असलेल्या खरेदी-विक्रीच्या दरम्यान सुरुवातीच्या एका तासाचा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर सकाळी १०:१५ वाजता निफ्टी १६.४५ अंक म्हणजेच ०.०७ टक्क्यांच्या कमजोरीसह २४,१९१.३० अंकांवर व्यवहार करत होता.

आतापर्यंतच्या व्यवहारात शेअर बाजारात २,९१९ समभागांमध्ये सक्रिय व्यवहार सुरू होते. त्यापैकी १,२५४ समभाग नफ्यासह हिरव्या निशाणावर व्यवहार करत होते, तर १,६६५ समभाग घसरणीसह लाल निशाणावर होते. त्याचप्रमाणे सेन्सेक्समध्ये समाविष्ट ३० समभागांपैकी १० समभाग खरेदीच्या पाठिंब्यामुळे हिरव्या निशाणावर होते. तर २० समभाग विक्रीच्या दबावामुळे लाल निशाणावर व्यवहार करत होते. निफ्टीमध्ये समाविष्ट ५० समभागांपैकी २१ समभाग हिरव्या निशाणावर, तर २९ समभाग लाल निशाणावर व्यवहार करताना दिसत होते.

सुरुवातीच्या एका तासाच्या व्यवहारानंतर शेअर बाजारातील आघाडीच्या कंपन्यांमध्ये कोटक महिंद्रा बँक, अदानी एंटरप्रायझेस, भारत इलेक्ट्रॉनिक्स, टेक महिंद्रा आणि बजाज फायनान्स यांच्या समभागांमध्ये २.२३ टक्क्यांपासून ०.७६ टक्क्यांपर्यंत वाढ दिसून येत होती. दुसरीकडे, श्रीराम फायनान्स, एचसीएल टेक्नॉलॉजीज, एचडीएफसी बँक, इंटरग्लोब एव्हिएशन आणि टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स यांच्या समभागांमध्ये १.८९ टक्क्यांपासून ०.८६ टक्क्यांपर्यंत घसरण नोंदवली जात होती.

याआधी, मागील कारोबारी दिवशी म्हणजेच बुधवारी सेन्सेक्स १८३.१५ अंक म्हणजेच ०.२४ टक्क्यांच्या घसरणीसह ७७,४७२.९४ अंकांवर बंद झाला होता. तर निफ्टी १२६.८० अंक म्हणजेच ०.५२ टक्क्यांच्या घसरणीसह २४,२०७.७५ अंकांवर बुधवारीच्या व्यवहाराचा शेवट केला होता.-------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande