दसऱ्याला बॉक्स ऑफिसवर रंगणार ‘रणबली’चा रणसंग्राम
मुंबई, 27 ऑगस्ट, (हिं.स.)। विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांची मुख्य भूमिका असलेला बहुप्रतिक्षित चित्रपट ''रणबली''च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. राहुल सांकृत्यान दिग्दर्शित हा तेलुगू चित्रपट दसऱ्याच्या मुहूर्तावर, म्हणजेच १६ ऑक
'रणबली'


मुंबई, 27 ऑगस्ट, (हिं.स.)। विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांची मुख्य भूमिका असलेला बहुप्रतिक्षित चित्रपट 'रणबली'च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. राहुल सांकृत्यान दिग्दर्शित हा तेलुगू चित्रपट दसऱ्याच्या मुहूर्तावर, म्हणजेच १६ ऑक्टोबरला जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. 'मैत्री मुव्ही मेकर्स'च्या बॅनरखाली निर्मित या चित्रपटात विजय 'रणबली' नावाच्या योद्ध्याच्या भूमिकेत दिसणार आहे, तर रश्मिका त्याच्या पत्नीची, 'जयम्मा'ची भूमिका साकारत आहे.

चित्रपट निर्मात्यांनी विजयचा समावेश असलेले एक प्रभावी पोस्टर प्रदर्शित करून प्रदर्शनाची तारीख जाहीर केली. या पोस्टरवर आपल्या इतिहासातील सर्वात गडद अध्याय या ऑक्टोबरमध्ये सुरू होत आहे, अशी ओळ लिहिली आहे. 'रणबली'ची कथा १८७० च्या दशकातील पार्श्वभूमीवर आधारित आहे. त्या काळात दक्षिण भारतात पडलेल्या भीषण दुष्काळादरम्यान ब्रिटीश राजवटीविरुद्ध आवाज उठवणाऱ्या एका बंडखोर योद्ध्याची कथा हा चित्रपट भव्य स्तरावर मांडणार आहे.

'डिअर कॉम्रेड' (२०१९) नंतर विजय आणि रश्मिकाची जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे. मात्र, बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची थेट टक्कर यामी गौतमच्या 'नयी नवेली'शी होणार आहे, जो चित्रपटही १६ ऑक्टोबरलाच प्रदर्शित होणार आहे. यामुळे दसऱ्याच्या काळात या दोन चित्रपटांमध्ये एक रंजक स्पर्धा पाहायला मिळणार आहे. 'रणबली'बद्दल, विशेषतः विजय आणि रश्मिकाच्या चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande