
लातूर, 28 ऑगस्ट (हिं.स.)।
भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आणि राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून श्री केशवराज शैक्षणिक संकुलातर्फे आज शनिवार, २९ ऑगस्ट २०२६ रोजी तालुकास्तरीय ‘अमृत दौड’ (मॅरेथॉन) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रमुख उद्देश उद्देश: आरोग्य, तंदुरुस्ती, राष्ट्रप्रेम आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव दृढ करणे.
• सहभाग: १८ वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी खुली (पूर्वनोंदणी आवश्यक).
• बक्षिसे: प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना पारितोषिके आणि प्रमाणपत्रे; सर्व सहभागींना सहभाग प्रमाणपत्र.
समारंभास जिल्हा क्रीडा अधिकारी व इतर शासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
• आवाहन: शहरातील जास्तीत जास्त युवक, युवती, महिला व पुरुषांनी सहभागी होण्याचे आवाहन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis