जात वैधता प्रमाणपत्रासाठी कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आवाहन
परभणी, 28 ऑगस्ट (हिं.स.)। आगामी सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी अनुसूचित जाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील विद्यार्थी व उमेदवारांनी जातविषयक आवश्यक पुरावे व कागदप
जात वैधता प्रमाणपत्रासाठी कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आवाहन


परभणी, 28 ऑगस्ट (हिं.स.)।

आगामी सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी अनुसूचित जाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील विद्यार्थी व उमेदवारांनी जातविषयक आवश्यक पुरावे व कागदपत्रांची पूर्तता ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर २०२६ रोजी कार्यालयीन वेळेत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे करावी, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती यांच्या वतीने करण्यात आले आहे.

ज्या विद्यार्थी व उमेदवारांना अद्याप जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त झालेले नाही किंवा त्यांच्या प्रकरणामध्ये जातविषयक आवश्यक पुरावे व कागदपत्रे सादर करणे बाकी आहे, त्यांनी वरील दोन दिवशी कार्यालयीन वेळेत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या कार्यालयात उपस्थित राहून प्रकरणातील त्रुटींची पूर्तता करावी. तसेच मानीव दिनांकापूर्वीचे आवश्यक जातविषयक पुरावे व कागदपत्रे सादर करावीत.

निर्धारित कालावधीत आवश्यक कागदपत्रे सादर केल्यास संबंधित प्रकरणांची पडताळणी प्रक्रिया तातडीने पूर्ण करून जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित करण्यास मदत होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील व्यावसायिक शिक्षणासाठी त्याचा लाभ होईल, असे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त प्रसाद कुलकर्णी यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे कळविले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande