परभणी - स्त्री रुग्णालय रेफर प्रकरणावर भीम आर्मीचा आक्षेप
परभणी, 28 ऑगस्ट, (हिं.स.)। येथील स्त्री रुग्णालयात ६ मार्च रोजी घडलेल्या गरोदर माता ''रेफर'' प्रकरणातील गंभीर निष्काळजीपणाबाबत प्रशासनाकडून चालढकल केली जात असल्याचा आरोप भीम आर्मी भारत एकता मिशनचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर बनसोडे (हंडोरे) यांनी केला
स्त्री रुग्णालय रेफर प्रकरणावर भीम आर्मीचा आक्षेप


परभणी, 28 ऑगस्ट, (हिं.स.)। येथील स्त्री रुग्णालयात ६ मार्च रोजी घडलेल्या गरोदर माता 'रेफर' प्रकरणातील गंभीर निष्काळजीपणाबाबत प्रशासनाकडून चालढकल केली जात असल्याचा आरोप भीम आर्मी भारत एकता मिशनचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर बनसोडे (हंडोरे) यांनी केला आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी गठीत त्रिसदस्यीय चौकशी समितीच्या अहवालामध्ये गंभीर त्रुटी व तफावती आढळून आल्याने या प्रकरणातील मूळ कागदपत्रे व प्रमाणित सत्यप्रती तात्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अधिष्ठाता यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

प्रशासनाने गठीत केलेल्या चौकशी अहवालाच्या निष्पक्षतेवर भीम आर्मीने तीव्र आक्षेप नोंदवला असून, स्त्री रुग्णालय प्रशासनाकडे विचारणा केली असता त्यांनी हे प्रकरण अधिष्ठाता कार्यालयाशी संबंधित असल्याचे सांगून जबाबदारी ढकलल्याचे स्पष्ट झाले आहे. गरोदर माता व नवजात बालकाच्या जिवाशी खेळणाऱ्या दोषींवर कारवाई व्हावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande