हजारो लाडक्या बहिणींच्या राख्यांनी सजले रवि राणांचे मनगट
अमरावती, 28 ऑगस्ट (हिं.स.) मानधन ३ हजार करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी रक्षाबंधनाच्या पावन पर्वानिमित्त शंकरनगर येथे आयोजित भव्य सामूहिक रक्षाबंधन सोहळ्यात अमरावतीचे आमदार रवि राणा यांना हजारो लाडक्या बहिणींनी राख्या बांधून शुभेच्छा दिल्या. सक
हजारो लाडक्या बहिणींच्या राख्यांनी सजले रवि राणांचे मनगट मानधन ३ हजार करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी


अमरावती, 28 ऑगस्ट (हिं.स.)

मानधन ३ हजार करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

रक्षाबंधनाच्या पावन पर्वानिमित्त शंकरनगर येथे आयोजित भव्य सामूहिक रक्षाबंधन सोहळ्यात अमरावतीचे आमदार रवि राणा यांना हजारो लाडक्या बहिणींनी राख्या बांधून शुभेच्छा दिल्या. सकाळी ९ वाजता सुरू झालेला हा उत्साहपूर्ण व भावनिक सोहळा सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरू होता. दिवसभर महिलांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला.यावेळी बोलताना आ. रवि राणा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे महत्त्वपूर्ण मागणी केली. आमदार आणि खासदारांचे पगार कमी करून राज्यातील लाडक्या बहिणींना मिळणारे प्रतिमहिना १,५०० रुपयांचे मानधन वाढवून ३,००० रुपये करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबांना अधिक आर्थिक आधार मिळावा, यासाठी मानधनवाढ आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.“लाडक्या बहिणींचे प्रेम आणि आशीर्वाद हीच माझी खरी ताकद आहे. हजारो बहिणींनी राखी बांधून व्यक्त केलेला विश्वास माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. त्यांच्या सुख-दुःखात भावाप्रमाणे सदैव उभा राहण्याचा माझा प्रयत्न राहील,” असे आ. राणा म्हणाले.कार्यक्रमात उपस्थित महिलांनी गीत व कविता सादर करून आ. रवि राणा यांच्या कार्याचे तसेच महिलांप्रती असलेल्या जिव्हाळ्याचे कौतुक केले. शंकरनगर परिसरात दिवसभर उत्साहाचे वातावरण होते.या सोहळ्याला उपमहापौर सचिन भेंडे, गटनेते नाना आमले, नगरसेवक प्रशांत वानखडे, अजय जयस्वाल, नगरसेविका सुमती ढोके, शिक्षण सभापती ॲड. प्रिती रेवणे, नगरसेविका अर्चना पांडे यांच्यासह महिला जिल्हाध्यक्षा सोनाली नवले, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हजारो महिला उपस्थित होत्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande