आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांचे वसतिगृहातील विद्यार्थिनींसोबत रक्षाबंधन
नाशिक, 28 ऑगस्ट (हिं.स.)। पेठरोड येथील ५०० क्षमतेच्या आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहात शुक्रवारी (दि.28) आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी वसतिगृहातील विद्यार्थिनींसोबत रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. या कार्यक्रमात एका दिव्य
आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांचे वसतिगृहातील विद्यार्थिनींसोबत रक्षाबंधन


नाशिक, 28 ऑगस्ट (हिं.स.)।

पेठरोड येथील ५०० क्षमतेच्या आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहात शुक्रवारी (दि.28) आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी वसतिगृहातील विद्यार्थिनींसोबत रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. या कार्यक्रमात एका दिव्यांग विद्यार्थिनीने डॉ. वुईके यांना प्रेमाची राखी बांधली, ज्यामुळे तिचा आनंद द्विगुणीत झाला. ना. डॉ. वुईके यांनी वसतिगृहातील मुलींशी संवाद साधत त्यांच्याशी हितगूज केले आणि त्यांना रक्षाबंधनानिमित्त शुभेच्छा दिल्या.

रक्षाबंधन सणानिमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी आदिवासी विकास आयुक्त लीना बनसोड, खासगी सचिव ललित वऱ्हाडे, अपर आयुक्त (मुख्यालय) डिगांबर चव्हाण, दिनकर पावरा, प्रकल्प अधिकारी अर्पिता ठुबे आदी मान्यवर उपस्थित होते.

वसतिगृहातील विद्यार्थिनींनी मंत्री डॉ. वुईके यांच्यासह सर्व उपस्थितांचे स्वागत केले. शासकीय वसतिगृहात घडलेल्या या आपुलकीच्या प्रसंगामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण पसरले होते. दरम्यान, आदिवासी समाजातील मुलींच्या शिक्षणासाठी आणि सुरक्षेसाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगत, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थिनींना आपलेपणाची भावना निर्माण होते, असे मत डॉ. वुईके यांनी व्यक्त केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande