वर्धा : हिंदी विद्यापीठात ‘खेलेगा भारत, जितेगा भारत’ अभियान
वर्धा, 28 ऑगस्ट (हिं.स.) : महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात विश्व विद्यालय अनुदान आयोग (यूजीसी) आणि भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त ‘खेलेगा भारत, जितेगा भारत’ या संकल्पनेवर आधारित त
वर्धा : हिंदी विद्यापीठात ‘खेलेगा भारत, जितेगा भारत’ अभियान


वर्धा, 28 ऑगस्ट (हिं.स.) : महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात विश्व विद्यालय अनुदान आयोग (यूजीसी) आणि भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त ‘खेलेगा भारत, जितेगा भारत’ या संकल्पनेवर आधारित तीन दिवसीय राष्ट्रीय अभियानाचे आयोजन करण्यात येत आहे. ‘ट्रिब्यूट, प्ले आणि मूव्ह’ या तीन प्रमुख स्तंभांवर हे अभियान आधारित आहे.

या अभियानांतर्गत शनिवारी 29 ऑगस्ट रोजी ‘एक घंटा खेल के मैदान में’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. सकाळी 8 वाजता दूरस्थ शिक्षण निदेशालयातील बॅडमिंटन कोर्टवर इंट्राम्युरल क्रीडा स्पर्धा 2026-27 चे उद्घाटन मैत्रीपूर्ण बॅडमिंटन सामन्याने होईल. यावेळी शिक्षक विरुद्ध विद्यार्थी तसेच शैक्षणिक कर्मचारी विरुद्ध अशैक्षणिक कर्मचारी यांच्यात मैत्रीपूर्ण सामने खेळविण्यात येणार आहेत. यानंतर सकाळी 9.30 वाजता दूरस्थ शिक्षण निदेशालयाच्या इमारतीत कुलगुरू प्रो. कुमुद शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली हॉकीचे महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पांजली व माल्यार्पण करण्यात येणार आहे.

धावण्याच्या उपक्रमातून ‘फिट इंडिया’चा संदेश

‘ब्रिक्स संडे ऑन सायकल’ उपक्रमांतर्गत रविवारी 30 ऑगस्ट रोजी सकाळी 7.30 वाजता फादर कामिल बुल्के आंतरराष्ट्रीय वसतिगृहापासून सावित्रीबाई फुले महिला वसतिगृहापर्यंत धावण्याच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमात विश्वविद्यालयातील शिक्षक, अधिकारी, कर्मचारी, एनसीसी व एनएसएसचे अधिकारी व स्वयंसेवक तसेच विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

राष्ट्रीय क्रीडा दिन 2026 निमित्त आयोजित या अभियानाच्या माध्यमातून क्रीडा, आरोग्य आणि शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व अधोरेखित करण्याबरोबरच ‘खेलेगा भारत, जितेगा भारत’ हा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.या अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन राष्ट्रीय क्रीडा दिनाचा संदेश व्यापक करण्यासाठी आपले योगदान द्यावे, असे आवाहन महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

----------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande