यवतमाळमधील पांढरकवडा आगाराला समस्यांचा वेढा
यवतमाळ, 29 ऑगस्ट (हिं.स.)। पांढरकवडा शहराचा झपाट्याने विस्तार होत आहे. मात्र त्या तुलनेत चांगल्या सुविधा नागरिकांना मिळत नाहीत. पांढरकवडा एसटी आगारही मोडकळीस आले असून दारूडे, पाकीटमारांचा वावर या ठिकाणी वाढत आहे. याशिवाय महिलांसाठी कोणातही सुरक
पांढरकवडा आगाराला समस्यांचा वेढा


यवतमाळ, 29 ऑगस्ट (हिं.स.)।

पांढरकवडा शहराचा झपाट्याने विस्तार होत आहे. मात्र त्या तुलनेत चांगल्या सुविधा नागरिकांना मिळत नाहीत. पांढरकवडा एसटी आगारही मोडकळीस आले असून दारूडे, पाकीटमारांचा वावर या ठिकाणी वाढत आहे. याशिवाय महिलांसाठी कोणातही सुरक्षा नाही. त्यातच डेपोमध्ये सुरक्षा कर्मचारी नसल्याने प्रवाशांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.

ग्रामीण भागातून एसटीने प्रवास करणार्!यांची संख्या लक्षणीय असते, मात्र आजच्या घडीला येथील बस आगाराची दुरवस्था झाली असून बस आगारच्या मुख्य दरवाजाच्या रस्त्यांवर भलामोठा खड्डा पडला आहे. तसेच डांबर ठिकठिकाणी उखडले आहे. ते बुजवण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. थोडी फार डागडुजी केली जाते. पण ते पुन्हा उखडतात. महिला शौचालयात पाणी जाण्याची व्यवस्था दोषपूर्ण असल्याने काही ठिकाणी पाणी साचून ते पुढे जात नाही. म्हणून त्या पाईपलाईन नूतीकरण आवश्यक आहे. बसस्थानक सुविधायुक्त असणे गरजेचे आहे. मात्र, एसटी महामंडळाला याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. त्यात या बसस्थानकामध्ये नेहमी सात ते आठ मद्यपी दारू पिऊन गोंधळ घालतात. बसस्थानकात असलेल्या आसणांवर दारू पिऊन झोपा काढतात. मद्यपीला ऐव्हडापण होश नसतो ते काय करीत आहेत, ते बसस्थानकाच्या आवरामध्येच दारू पिऊन लघुशंका करतात, महिलांनाची छेड काढतात. त्यामुळे महिला आणि मुलींना याचा खूप त्रास सहन करावा लागतो. अशा एक ना अनेक समस्यांनी ग्रस्त असलेल्या या बस डेपोला वाली नसल्याने या ठिकाणी दारुड्यांसह चिडीमारांनीही आपला अड्डा बनविला आहे. बस स्थानक म्हणजे ’आवो जावो घर तुम्हारा’अशी अवस्था झाली आहे. एसटी बसने या भागात प्रवास करणार्!या प्रवाशांची संख्यादेखील अधिक आहे. दारुडे लोक प्रवाशांना भिक मागून दारूच्या बाटल्या आणून बस स्थानकामध्ये असलेल्या पाणपोईमध्ये गिलासात रिचवतात व या बाटल्या तसेच पाणपोईमध्ये टाकून बस स्थानकाच्या आवारात झोपी जातात.

पांढरकवडा बसस्थानकाच्या बाजूलाच अनेक दारूची दुकाने असल्याने येथे दारुड्यांची नेहमीच वर्दळ असते. त्यामुळे महिला सुरक्षेचा प्रश्न सुद्धा निर्माण होतो. आम्ही पत्राद्वारे अनेकदा पोलिस ठाण्यात पोलिस चौकीची मागणीसुद्धा केली आहे. परंतु, सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. - आशिष काकडे, आगार व्यवस्थापक, पांढरकवडा

------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande