नेपाळ-तिबेट पूरस्थितीत महाराष्ट्रातील ४०४ नागरिक अडकले; ३३८ जणांशी संपर्क
रायगड, 29 ऑगस्ट (हिं.स.)। नेपाळ-तिबेट परिसरात २६ ऑगस्ट रोजी आलेल्या भीषण पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, महाराष्ट्रातील ४०४ नागरिक या भागात अडकले आहेत. २९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजेपर्यंत यापैकी ३३८ नागरिकांशी संपर्क प्रस्थापित झाला असून त
नेपाळ-तिबेट पूरस्थितीत महाराष्ट्रातील ४०४ नागरिक अडकले; ३३८ जणांशी संपर्क


रायगड, 29 ऑगस्ट (हिं.स.)। नेपाळ-तिबेट परिसरात २६ ऑगस्ट रोजी आलेल्या भीषण पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, महाराष्ट्रातील ४०४ नागरिक या भागात अडकले आहेत. २९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजेपर्यंत यापैकी ३३८ नागरिकांशी संपर्क प्रस्थापित झाला असून ते सुरक्षित असल्याची माहिती महाराष्ट्राच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे.

अडकलेल्या नागरिकांपैकी ६० जण ‘रिचा टूर्स प्रा. लि.’ या संस्थेमार्फत प्रवासाला गेले होते. या गटाशी अद्याप थेट संपर्क होऊ शकलेला नाही. तसेच अन्य सहा नागरिकांची माहिती वेब लिंकद्वारे प्राप्त झाली असून, त्यांच्याशीही संपर्क साधता आलेला नसल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, ४०४ सुरक्षित नागरिकांपैकी नागपूरमधील १०५ नागरिक भारतात परतले आहेत. तसेच ३७ नागरिक सागा (मानसरोवरजवळ) येथून भारताच्या दिशेने रवाना झाले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाकडून चीन-तिबेट परिसरात असलेल्या भारतातील १४९ नागरिकांची यादी महाराष्ट्राला प्राप्त झाली असून, या नागरिकांची माहिती संबंधित जिल्ह्यांकडून वेगाने संकलित व पडताळली जात आहे.

महाराष्ट्र राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने (SEOC) अडकलेल्या नागरिकांची माहिती संकलित करण्यासाठी वेब-आधारित लिंक विकसित केली आहे. ही लिंक सर्व जिल्ह्यांना पाठविण्यात आली असून माध्यमांद्वारेही तिचा प्रसार करण्यात आला आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या नियंत्रण कक्षाशी सातत्याने समन्वय साधला जात असून, आवश्यक बचाव पथके घटनास्थळी तैनात करण्यात आली आहेत. हरवलेल्या नागरिकांचा शोध सुरू आहे.

अडकलेल्या नागरिकांच्या कुटुंबीय आणि प्रवासी संस्थांशी हेल्पलाइनद्वारे संपर्क ठेवण्यात येत आहे. परिस्थितीची अद्ययावत माहिती गृह मंत्रालयाच्या आपत्कालीन प्रतिसाद नियंत्रण कक्षासह परराष्ट्र मंत्रालय आणि महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली यांना देण्यात येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande