अमरावतीत बालरुग्णांसाठी दोन तात्पुरते एसएनसीयू; सात-आठ दिवसांत सुविधा सुरू करण्याचे नियोजन
अमरावती, 29 ऑगस्ट (हिं.स.)। अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात २४ ऑगस्ट रोजी लागलेल्या आगीत ३ बालकांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर रुग्णालयातील एसएनसीयू पूर्णपणे बंद आहे. दरम्यान बालरुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी आरोग्य विभागाने युद्धपातळीवर हा
डफरीन' मध्ये ८ दिवसात सुरु होणार तात्पुरते 30 मिनी बेडचे 'एसएनसीयू'


अमरावती, 29 ऑगस्ट (हिं.स.)। अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात २४ ऑगस्ट रोजी लागलेल्या आगीत ३ बालकांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर रुग्णालयातील एसएनसीयू पूर्णपणे बंद आहे. दरम्यान बालरुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी आरोग्य विभागाने युद्धपातळीवर हालचाली सुरू केल्या आहेत. डफरीन रुग्णालयात तात्पुरत्या स्वरूपात प्रत्येकी १५ बेडचे दोन एसएनसीयू उभारण्यात येणार असून, येत्या सात ते आठ दिवसांत ही सुविधा सुरू करण्याचे नियोजन आहे.

जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरील एसएनसीयूमध्ये आग लागली होती. या दुर्घटनेत आउटबॉर्न युनिटमधील तीन बालकांचा मृत्यू झाला. फॉरेन्सिक पंचनामा पूर्ण झाल्यानंतर संबंधित युनिट सील करण्यात आले आहे. दरम्यान, त्याला लागून असलेल्या अन्य दोन युनिटच्या स्वच्छतेचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र, स्त्री रुग्णालयातील कायमस्वरूपी एसएनसीयूची यंत्रणा पूर्ववत करण्यास वेळ लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे तोपर्यंत नवजात आणि गंभीर अवस्थेतील बालकांना उपचार मिळावेत, यासाठी डफरीन रुग्णालयात पर्यायी एसएनसीयू उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पहिल्या मजल्यावर १५, तर तळमजल्यावर १५ असे एकूण ३० मिनीबेडचे दोन तात्पुरते एसएनसीयू युनिट उभारण्यात येणार आहेत

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande