परभणी - संगणकशास्त्र विषयात अश्विनी वाघमारे यांना पीएचडी पदवी
परभणी, 29 ऑगस्ट, (हिं.स.)। परभणी येथील ज्ञानोपासक कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात कार्यरत असलेल्या सौ. अश्विनी शाहूराज वाघमारे (कांबळे) यांनी संगणकशास्त्र विषयात अथक परिश्रम, जिद्द आणि सातत्यपूर्ण संशोधनाच्या बळावर पीएच.डी (विद्यावाच
परभणी - संगणकशास्त्र विषयात अश्विनी वाघमारे यांना पीएचडी पदवी


परभणी, 29 ऑगस्ट, (हिं.स.)। परभणी येथील ज्ञानोपासक कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात कार्यरत असलेल्या सौ. अश्विनी शाहूराज वाघमारे (कांबळे) यांनी संगणकशास्त्र विषयात अथक परिश्रम, जिद्द आणि सातत्यपूर्ण संशोधनाच्या बळावर पीएच.डी (विद्यावाचस्पती) पदवी संपादन केली. त्यांनी ‘ब्लर इमेज रिस्टोरेशन युजिंग सॉफ्ट कॉम्प्युटिंग टेक्निक्स’ या विषयावर संशोधन कार्य पूर्ण केले.

या संशोधनासाठी गंगाखेड येथील श्री संत जनाबाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील संशोधक मार्गदर्शक डॉ. सुहास सूर्यकांतराव सातोनकर यांचे मोलाचे मार्गदर्शन त्यांना लाभले. संगणकशास्त्रातील प्रतिमा पुनर्स्थापना या आधुनिक संशोधन क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय मानले जात आहे. अश्विनी वाघमारे यांच्या या यशाबद्दल स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन तसेच संशोधक मार्गदर्शक डॉ. सुहास सूर्यकांतराव सातोनकर यांनी त्यांचे अभिनंदन केले.

त्यांच्या या यशाबद्दल ज्ञानोपासक शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष गणेशराव दुधगावकर, सचिव तथा प्राचार्या डॉ. संध्याताई दुधगावकर, डॉ. समीर दुधगावकर, ज्ञानोपासक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेख मो. बाबर, शारदा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बबन पवार, प्रा. डॉ. रत्नाकर कांबळे, प्रा. डॉ. सच्चिदानंद खडके, डॉ. दत्ता चामले, डॉ. सुनील बल्लाळ, संगणकशास्त्र विभागप्रमुख प्रा. भिसे, प्रा. ज्योती आगरमोरे, प्रा. खाजा, प्रा. शीतल थिटे, प्रा. विद्या वाघमारे, प्रा. वैभव कदम, प्रा. प्रद्युम्न माने, प्रा. जुनेद शेख, प्रा. हजेरा चाऊस, प्रा. संपदा कंदी, विशाल घोडके यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande