रत्नागिरीतील ब्रिजपटू अभय लेले यांचे निधन
रत्नागिरी, 29 ऑगस्ट (हिं.स.) । येथील प्रसिद्ध ब्रिजपटू तसेच वसंत फूड्सचे संचालक अभय लेले (वय ५९) यांचे काल (दि. २८ ऑगस्ट) झाडगाव-शेरे नाका येथील राहत्या घरी निधन झाले. अभय लेले नामांकित ब्रिज खेळाडू होते. रत्नागिरी ब्रिज असोसिएशनमध्ये ते सक्रिय हो
अभय लेले


रत्नागिरी, 29 ऑगस्ट (हिं.स.) । येथील प्रसिद्ध ब्रिजपटू तसेच वसंत फूड्सचे संचालक अभय लेले (वय ५९) यांचे काल (दि. २८ ऑगस्ट) झाडगाव-शेरे नाका येथील राहत्या घरी निधन झाले.

अभय लेले नामांकित ब्रिज खेळाडू होते. रत्नागिरी ब्रिज असोसिएशनमध्ये ते सक्रिय होते, त्यांनी अनेक स्पर्धांमध्ये बक्षिसे मिळवली होती. अभय लेले यांनी काही वर्षांपूर्वी वसंत फूड्सची सुरुवात करून रत्नागिरी शहर व परिसरातील नागरिकांसाठी नाममात्र दरात घरपोच पोळी-भाजी सेवा सुरू केली होती. त्यांच्या या उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. विशेषतः कोरोनाच्या महामारीच्या काळात त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत अनेक रुग्ण तसेच त्यांच्या नातेवाईकांना जेवणाची सुविधा उपलब्ध करून दिली. त्यांच्या या सेवाभावी वृत्तीचे त्यावेळी अनेकांनी कौतुक केले होते.

गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारांनंतर ते आपल्या निवासस्थानी होते. काल दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर मुरुगवाडा येथील अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.

लेले यांच्या पश्चात आई, पत्नी, विवाहित मुलगी, जावई असा परिवार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande