
चंद्रपूर, 29 ऑगस्ट (हिं.स.)।
ताडोबा प्रकल्पाच्या मोहर्ली वनपरिक्षेत्रातील बफर भागात गुरे चारावयास घेऊन गेलेल्या गुराख्याचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना दुपारी १ वाजता घडली.
जुनोना येथील रहिवासी असलेले विजय मधुकर मेश्राम (२५) हा तरुण गुराखी मोहर्ली-१ मधील कक्ष क्रमांक १५४ मध्ये गुरे चारावयास घेऊन गेले होते. त्यावेळी त्यांचेवर अचानक वाघाने हल्ला चढवीत त्यांच्या नरडीचा घोट घेतला. सदर घटनेची माहिती प्राप्त होताच वनपरिक्षेत्राधिकारी संतोष थिपे, पोलीस निरीक्षक संतोष शेगावकर व त्यांची चमू घटनास्थळी तातडीने दाखल झाले. मृतकाचे शव शवविच्छेदन करण्याकरिता ग्रामीण रुग्णालय, भद्रावती येथे नेण्यात आले. मृत इसमाची आई निरंजना मधुकर मेश्राम यांना घटनास्थळावरच तात्काळ ५० हजार रुपये मदत देण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव