कॉंग्रेसचे अच्छे दिनवर साखर वाटून अनोखे आंदोलन
महागाई, इथेनॉल भेसळ व साखरेच्या आयातीवरून धुळ्यात जोरदार निदर्शने धुळे, 29 ऑगस्ट (हिं.स.) देशात सातत्याने वाढणारी महागाई, पेट्रोलमधील इथेनॉलचे भेसळयुे धोरण आणि ऐन सणासुदीच्या काळात साखरेची कृत्रिम टंचाई निर्माण करून जनतेची लूट करणार्या केंद्र व रा
कॉंग्रेसचे अच्छे दिनवर साखर वाटून अनोखे आंदोलन


महागाई, इथेनॉल भेसळ व साखरेच्या आयातीवरून धुळ्यात जोरदार निदर्शने

धुळे, 29 ऑगस्ट (हिं.स.) देशात सातत्याने वाढणारी महागाई, पेट्रोलमधील इथेनॉलचे भेसळयुे धोरण आणि ऐन सणासुदीच्या काळात साखरेची कृत्रिम टंचाई निर्माण करून जनतेची लूट करणार्या केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांचा धुळे जिल्हा व शहर कॉंग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत उपस्थित पत्रकारांच्या प्रश्नांना कॉंग्रेस नेत्यांनी उत्तरे दिली. या पत्रकार परिषदेनंतर कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी व पदाधिकार्यांनी शहरातील शिवतीर्थ परिसरात जाऊन सर्वसामान्य जनतेला साखर खाऊ घालत अच्छे दिन आल्याची जोरदार व्यंग्यात्मक टिका केली.

पत्रकार परिषदेत टिका पत्रकार परिषदेत बोलताना महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष भा. ई. नगराळे, खड आणि महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस डॉ. दरबारसिंग गिरासे यांच्यासह कॉंग्रेस नेत्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. पूर्वी ३५ ते ४० प्रति किलो मिळणारी साखर आता थेट ७० ते ८० वर पोहोचली आहे. येत्या सणासुदीच्या काळात ही दरवाढ आणखी भडकणार असून बाजारात काळाबाजार (ब्लॅक मार्केट) सुरू करण्याचे नियोजन आखले गेले आहे. सरकारच्या या धोरणामुळे सुमारे ३६ ते ४० हजार कोटी रुपयांची लूट सर्वसामान्यांच्या खिशातून केली जात आहे. एकीकडे साखरेचे भाव गगनाला भिडले आहेत, तर दुसरीकडे उसाचा गैरवापर करून पेट्रोलमध्ये ई २० इथेनॉल मिसळले जात आहे. यामुळे नागरिकांच्या वाहनांच्या इंजिनचा पूर्ण कचरा झाला असूनही इंधनाचे दर १ रुपयानेही कमी केलेले नाही, उलटपक्षी ते वाढवले आहेत, असा घणाघाती आरोप त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना केला. तसेच, देशांतर्गत साखरेचा तुटवडा निर्माण झाल्यावर मुद्दाम ३ महिने उशिराने ब्राझीलकडून कच्ची साखर आयात करण्याचा निर्णय दिनांक २० ऑगस्ट २०२६ रोजी घेण्यात आला आहे. ती भारतात येऊन प्रक्रियेनंतर प्रत्यक्ष बाजारात येईपयरत ६० ते ७५ दिवसांचा कालावधी लागणार आहे. मधल्या काळात आपल्या मर्जीतील उद्योगपती मित्रांचा फायदा करून देण्यासाठी हा खेळ खेळला जात असल्याचे नेत्यांनी स्पष्ट केले. शिवतीर्थ चौकात साखर वाटप पत्रकार परिषदेनंतर कॉंग्रेस पदाधिकार्यांनी शिवतीर्थ परिसरात जाऊन रस्त्यावरील नागरिक, वाहनधारक व व्यापार्यांना साखर भरवून आंदोलन केले. स्वत...च्या पैशाने तोंड गोड करणे आता अशक्य झाल्याने कॉंग्रेसतर्फे हे तोंड गोड केले जात आहे, असा टोला लगावला असता, उपस्थित नागरिकांनीही हसत साखर खाऊन या अनोख्या व्यंग्यात्मक आंदोलनाला दाद दिली व सरकारविरोधात तीव्र असंतोष व्ये केला. या आंदोलनात महाराष्ट्रप्रदेश कॉंग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा निवृत्त आयएएस अधिकारी भा. ई. नगराळे, प्रदेश चिटणीस डॉ. दरबारसिंग गिरासे, ज्येष्ठ नेते रमेशअण्णा श्रीखंडे, धुळे शहर कॉंग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष सुधीर जाधव, पितांबर महाले, कार्याध्यक्ष मुझफ्फर हुसेन यांच्यासह कॉंग्रेसच्या विविध आघाड्यांचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande