नांदेडमध्ये भव्य सार्वजनिक दहीहंडी उत्सवाच्या तयारीला वेग
नांदेड, 29 ऑगस्ट (हिं.स.)। भारतीय जनता पार्टी महानगर नांदेड तथा युवा मोर्चाच्या संयुक्त विद्यमानाने डॉ आशुतोष अमरनाथ राजूरकर आयोजित भव्य सार्वजनिक दहीहंडी उत्सवाच्या तयारीला आता प्रत्यक्षात वेग आला आहे. भारतीय जनता पक्षाचे आमदार अमरनाथ राजुरकर य
अ


नांदेड, 29 ऑगस्ट (हिं.स.)।

भारतीय जनता पार्टी महानगर नांदेड तथा युवा मोर्चाच्या संयुक्त विद्यमानाने डॉ आशुतोष अमरनाथ राजूरकर आयोजित भव्य सार्वजनिक दहीहंडी उत्सवाच्या तयारीला आता प्रत्यक्षात वेग आला आहे.

भारतीय जनता पक्षाचे आमदार अमरनाथ राजुरकर यांनी उत्सवाच्या मुख्य यशवंत कॉलेज मैदानावर सर्व सहकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष उपस्थित राहून संपूर्ण जागेची पाहणी केली आणि नियोजनाचा आढावा घेतला.

भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाचे निमंत्रण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना देण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande