उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी परभणी जिल्हा दौऱ्यावर
परभणी, 29 ऑगस्ट (हिं.स.)। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रविवार, दि. ३० ऑगस्ट रोजी परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. सकाळी मुंबई विमानतळावरून ११.३० वाजता ते विमानाने नांदेडकडे रवाना होतील. दुपारी १२.१५ वाजता नांदेड विमानतळावर आगमन
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी परभणी जिल्हा दौऱ्यावर


परभणी, 29 ऑगस्ट (हिं.स.)। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रविवार, दि. ३० ऑगस्ट रोजी परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. सकाळी मुंबई विमानतळावरून ११.३० वाजता ते विमानाने नांदेडकडे रवाना होतील. दुपारी १२.१५ वाजता नांदेड विमानतळावर आगमन झाल्यानंतर हेलिकॉप्टरने परभणीकडे प्रयाण करतील. दुपारी १२.४० वाजता परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हेलिपॅडवर त्यांचे आगमन होईल.

यानंतर मोटारीने वसमत रोड, परभणीकडे रवाना होऊन दुपारी १२.५० वाजता शिवाजी कॉम्प्लेक्स, वसमत रोड येथे खासदार संजय जाधव यांच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनासह रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्यास ते उपस्थित राहतील. दुपारी १ वाजता प्रियदर्शिनी इंदिरा गांधी स्टेडियमकडे प्रयाण करून १.०५ वाजता शिवसेना पक्ष मेळावा तसेच शेतकरी व युवा संवाद मेळाव्यास उपस्थित राहतील. दुपारी २.१५ वाजता जिंतूर रोडकडे प्रयाण करून २.३० वाजता बाळासाहेब ठाकरे नगर, जिंतूर रोड येथील खासदार संजय जाधव यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देतील. त्यानंतर दुपारी ३.१५ वाजता अक्षदा मंगल कार्यालयाकडे प्रयाण करून ३.३० वाजता विविध क्षेत्रातील मान्यवर व शिष्टमंडळांसमवेत सदिच्छा भेट व चर्चा करतील. सायंकाळी ४.१५ वाजता वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हेलिपॅडकडे रवाना होऊन ४.३० वाजता हेलिकॉप्टरने नांदेडकडे प्रयाण करतील. ४.४५ वाजता नांदेड विमानतळावरून विमानाने मुंबईकडे रवाना होतील.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande