शिक्षणामुळे व्यक्ती, समाज आणि देशाची प्रगती होते : आ.संजय बनसोडे
लातूर, 29 ऑगस्ट (हिं.स.)। देशाची भावी पिढी घडविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य शाळा आणि शिक्षकांच्या माध्यमातून होत असते. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता संस्कार, शिस्त, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रप्रेमाची शिकवण देणे गरजेचे आहे. शिक्षणामुळे
संजय बनसोडे


लातूर, 29 ऑगस्ट (हिं.स.)।

देशाची भावी पिढी घडविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य शाळा आणि शिक्षकांच्या माध्यमातून होत असते. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता संस्कार, शिस्त, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रप्रेमाची शिकवण देणे गरजेचे आहे. शिक्षणामुळे व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक बदल घडतो आणि त्यातूनच समाजाची व देशाची प्रगती होते, असे प्रतिपादन माजी मंत्री आ. संजय बनसोडे यांनी केले.

ते उदगीर शहरातील अल हिलाल उर्दू गर्ल हायस्कुल येथे आयोजीत शालेय साहित्य वाटप प्रसंगी बोलत होते.

यावेळी वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापुरे,माजी उपसभापती रामराव बिरादार, जि.प. चे बांधकाम व आरोग्य सभापती ज्ञानेश्वर बिरादार, संस्थेचे अध्यक्ष रफीउद्दिन फारुकी, आयुब मिर्झा, वसंत पाटील, सय्यद इम्रान, रहमत खान, सनम उल्ला खान, हाश्मी सय्यद, नाजीम खुर्शीद मुन्सी, सिराज बानेकर, मुन्सी शब्बीर अहमद, जफर शेख, शेख फकरु मौला, सय्यद मोहमद, रियाज फारुकी, कमलाकर फुले, शाहीन बाजी, अबरार पठाण, जरगर अजगरी, शेख इरशाद, हाशमी सालिहा, लुबना गजल, शेख शहरीन नाझीमा, आदी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी शिक्षणाला आपल्या जीवनातील सर्वाधिक महत्त्वाचे साधन मानावे. शिक्षणामुळे माणसाला ज्ञान, आत्मविश्वास आणि विचार करण्याची क्षमता प्राप्त होते. परिस्थिती कोणतीही असली तरी जिद्द, मेहनत आणि योग्य शिक्षणाच्या जोरावर विद्यार्थी आपल्या जीवनात यश संपादन करू शकतो. त्यामुळे ग्रामीण व सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांनाही दर्जेदार शिक्षणाच्या सुविधा मिळणे आवश्यक असल्याचे माजी मंत्री आ. संजय बनसोडे यांनी सांगितले.

शाळा ही केवळ ज्ञान देणारी संस्था नसून देशाचे भवितव्य घडविणारे केंद्र आहे. आज शाळेत शिकणारा विद्यार्थी उद्याचा डॉक्टर, अभियंता, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, उद्योजक किंवा लोकप्रतिनिधी होऊ शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणासोबतच सामाजिक जाणीव आणि जबाबदारीची भावना निर्माण करण्याची गरज आहे.

शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देत त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करावेत, असेही आ.संजय बनसोडे यांनी सांगितले.

आजच्या स्पर्धात्मक युगात शिक्षणाचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे. आधुनिक तंत्रज्ञान, डिजिटल शिक्षण आणि विविध कौशल्यांचा विद्यार्थ्यांनी योग्य वापर करून आपले भविष्य उज्ज्वल करावे. मात्र आधुनिक शिक्षणाबरोबर संस्कार आणि मानवी मूल्येही तितकीच महत्त्वाची आहेत. “शिक्षणाने आपली प्रगती होते आणि सुशिक्षित, संस्कारित पिढीमुळे देशाची प्रगती होते,” असे आ. संजय बनसोडे यांनी यावेळी सांगितले.

विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत. पालक, शिक्षक आणि समाजाने विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन व प्रोत्साहन दिल्यास ग्रामीण भागातूनही अनेक गुणवंत विद्यार्थी देशाच्या विकासात मोलाचे योगदान देऊ शकतील, असा विश्वास आ. संजय बनसोडे यांनी व्यक्त केला.

यावेळी विद्यार्थी, पालक व नागरीक, शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande