अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील अग्निसुरक्षा यंत्रणा कार्यरत असल्याचा विद्युत व सा.बां. विभागाचा दावा; अग्निकांडाने निर्माण केले प्रश्न
अमरावती, 29 ऑगस्ट (हिं.स.)। जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात बालक अतिदक्षता कक्षाच्या व्हेंटिलेटरमध्ये स्फोट होऊन २४ ऑगस्ट रोजी पहाटे ३.३० वाजता दुर्दैवी घटना घडली. या घटनेबाबत वस्तुस्थितीदर्शक माहिती सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग अमरावती मुख
अग्निसुरक्षा यंत्रणा कार्यरत असल्याचा विद्युत व सार्वजनिक बांधकाम विभागाचा दावा; अग्निकांडाने निर्माण केले प्रश्न


अमरावती, 29 ऑगस्ट (हिं.स.)।

जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात बालक अतिदक्षता कक्षाच्या व्हेंटिलेटरमध्ये स्फोट होऊन २४ ऑगस्ट रोजी पहाटे ३.३० वाजता दुर्दैवी घटना घडली. या घटनेबाबत वस्तुस्थितीदर्शक माहिती सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग अमरावती मुख्य अभियंता कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

एप्रिल व में २०२६ मध्येच सार्वजनिक बांधकाम विद्युत विभागाने जिल्हा स्त्री रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय व इतर रुग्णालयातील अग्रीसूचक व अग्रिशमन यंत्रणेची देखभाल व दुरुस्ती करून महापालिकेच्या अग्निशमन अधिकाऱ्याकडे फॉर्म-बी सादर करण्याकरता ई-निविदा पूर्ण झालेली होती. संबंधित फायर कंत्राटदारास २३ जून २०२६ रोजीच कार्यारंभ करण्याचा आदेश जारी करण्यात आला होता. विभागाद्वारे आवश्यक कार्यवाही आधीच पूर्ण केलेली आहे. त्यामुळे ३७ दिवस पत्राकडे दुर्लक्ष केल्याची माहिती वस्तुस्थितीला धरून नसल्याचे सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग अमरावती मुख्य अभियंता कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

आवश्यक यंत्रणा दुरुस्ती करून कंत्राटदाराने प्राथमिक फायर ऑडिट अहवाल ३० जून २०२६ रोजी सादर केला. संपूर्ण यंत्रणा सुस्थितीत असल्याची शहानिशा करून आली होती. फायर ऑडिट झाले नसल्याची २२ ऑगस्ट रोजी यंत्रणा कार्यान्वित करण्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचे म्हणणे आहे. बाब वस्तुस्थितीशी सुसंगत नसल्याचे विद्युत संच मांडणीचा दर्जा योग्य असून त्यानुसार वीज संच मांडणी मधील सर्व सुरक्षा उपकरणे संपूर्ण वायरिंग, स्विच,गिझर हे भारतीय मानक ब्यूरो मानांकित व उच्ब दर्जाचीच आहेत तसेच रुग्णालयातील अतिदक्षता कक्ष व नवजात बालक कक्षात संच मांडणीत ओव्हर करंट व अर्थ फॉल विद्युत विभागाद्वारे करण्यात आलेल्या विद्युत प्रणालीचा अवलंब करण्यात आला होता व प्रोटेक्शनकरिता त्रिस्त्रीस्तरीय विद्युत सुरक्षा उपकरणे, संपूर्ण वायरिंग, स्विच गिज्जर हे ज्या व्हेंटिलेटरमध्ये स्फोट होऊन ही दुर्दैवी घटना घडली, त्यावेळेस संबंधित व्हेंटिलेटरची ३२ ए क्षमतेची आरसीबीही ट्रीप झालेली होती. ३० जुलै २०२६ रोजी रुग्णालयातील ६१ अग्निशमन यंत्रणांचे रिफिलिंग करून रुग्णालयात पुनः स्थापित करण्यात आल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे म्हणणे आहे.सार्वजनिक बांधकाम विद्युत विभागामार्फत जिल्हा स्त्री रुग्णालयात विद्युतीकरण, अग्नीसूचक आणि अग्निशामक यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. मे ते जुलै २०२५ पर्यंत टप्प्याटप्प्याने या रुग्णालयाकडे ही यंत्रणा रीतसरपणे हस्तांतरित करण्यात आली आहे.हस्तांतरणाच्या वेळी महापालिकेचे अग्निशमन अधिकारी, फायर कंत्राटदार, सार्वजनिक बांधकाम विद्युत विभागाचे अधिकारी- कर्मचारी तथा रुग्णालयातील अधिकारी - कर्मचारी यांच्यासह संयुक्तपणे संपूर्ण यंत्रणेचे मॉक ड्रिल घेण्यात आले व आपत्कालीन परिस्थितीत ही यंत्रणा कशी हाताळायची याबाबत प्राथमिक सूचना देण्यात आल्या होत्या. संपूर्ण संच मांडणीची देखभाल व दुरुस्ती विषयक कामे विभागाद्वारे नियमितपणे करण्यात येत असल्याचा दावा देखील सार्वजनिक बांधकाम विभागाने केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande