
नियमित पाहणी करून एकात्मिक पीक व्यवस्थापन करण्याचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर, २९ ऑगस्ट (हिं.स.) : जिल्ह्यात खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र ५ लाख ५४ हजार १६० हेक्टर असून, यंदा आतापर्यंत ५ लाख ३२ हजार ९७० हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. यामध्ये जिल्ह्याचे प्रमुख खरीप पीक असलेल्या सोयाबीनची ४ लाख ६४ हजार ७५४ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सध्या सोयाबीन पीक फुलोरा ते शेंगा धरणे व शेंगा भरणे या महत्त्वाच्या अवस्थेत असून, पिकाची नियमित पाहणी करून योग्य व्यवस्थापन करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
सोयाबीन पिकाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी मौजे रुईभर, ता. धाराशिव येथे कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ, कृषी उपसंचालक, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी तसेच शेतकऱ्यांनी क्षेत्रभेट दिली. यावेळी सोयाबीन पिकाच्या विविध अवस्था, ओलाव्याच्या ताणाचा परिणाम, रोग-किडींचा प्रादुर्भाव आणि पुढील काळातील पीक व्यवस्थापनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
पावसाचा खंड पडल्याने काही भागांमध्ये सोयाबीनच्या वाढीवर परिणाम झाला असून, काही ठिकाणी झाडांनी माना टाकणे, पानांची लवकर वृद्धत्वाकडे वाटचाल होणे आणि अन्नद्रव्यांचे शोषण कमी होणे अशी लक्षणे दिसून आली. मात्र, अलीकडील पावसामुळे जमिनीतील उपलब्ध ओलावा वाढल्याने अनेक भागांतील पिकाची स्थिती सुधारत आहे.
सध्या पीक फुलोरा, शेंगा धरणे आणि शेंगा भरणे या अवस्थेत असल्याने या काळात शेतकऱ्यांनी नियमितपणे पिकाची पाहणी करणे आवश्यक आहे.
क्षेत्र पाहणीदरम्यान काही ठिकाणी सोयाबीनवर पाने व शेंगा पोखरणाऱ्या अळींचा प्रादुर्भाव आढळून आला. विशेषतः स्पोडोप्टेरा, हेलिकोव्हर्पा (हरभरा घाटे अळी) यांसह इतर अळ्या फुलोरा संपल्यानंतर आणि शेंगा विकसित होत असताना पिकाचे नुकसान करू शकतात.
प्रादुर्भाव वाढल्यास पाने कुरतडली जाणे, शेंगांना छिद्रे पडणे आणि शेंगांतील दाण्यांचे नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे केवळ दिसेल त्या ठिकाणी फवारणी न करता पिकाची नियमित पाहणी करून प्रादुर्भावाची तीव्रता लक्षात घेऊनच उपाययोजना कराव्यात.
प्रादुर्भाव आढळल्यास कृषी विभाग किंवा कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार योग्य कीटकनाशकाची निवड करावी. एमामेक्टीन बेन्झोएट, कॉराजन, टाकुमी किंवा इतर शिफारशीत कीटकनाशकांचा वापर संबंधित कीटक, पिकाची अवस्था आणि मंजूर लेबल क्लेमनुसारच करावा. शिफारशीत मात्रा, पाण्याचे प्रमाण, प्रतीक्षा कालावधी आणि सुरक्षिततेच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे. एकाच रासायनिक गटातील कीटकनाशकांचा वारंवार वापर टाळून फेरपालट करावी. अंधाधुंद फवारणी किंवा एकापेक्षा अधिक कीटकनाशके एकत्र मिसळून फवारणी करू नये.जिल्ह्यातील काही भागांत सोयाबीनवर पिवळा मोझेकसदृश लक्षणे दिसून येत असल्याने शेतकऱ्यांनी विशेष दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात
----------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis