यवतमाळमध्ये एकाच कुटुंबातील तिघांची घरकुल चौकशीची मागणी; साखरा येथील पात्र लाभार्थी वंचित
यवतमाळ29 ऑगस्ट (हिं.स.)। घाटंजी तालुक्यातील साखरा खुर्द येथे प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुल वाटपात अनियमितता होत असल्याचा आरोप करीत वंचित लाभार्थ्यांनी पंचायत समिती कार्यालयात धडक दिली. एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींची घरकुलासाठी लाभार्थी म्हण
एकाच कुटुंबातील तिघांना घरकुल चौकशीची मागणी; साखरा येथील पात्र लाभार्थी वंचित


यवतमाळ29 ऑगस्ट (हिं.स.)।

घाटंजी तालुक्यातील साखरा खुर्द येथे प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुल वाटपात अनियमितता होत असल्याचा आरोप करीत वंचित लाभार्थ्यांनी पंचायत समिती कार्यालयात धडक दिली. एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींची घरकुलासाठी लाभार्थी म्हणून निवड होत असताना, प्रत्यक्षात गरजू व पात्र लाभार्थ्यांना मात्र योजनेच्या लाभापासून डावलून वंचित ठेवण्यात येत असल्याचा गंभीर आरोप गटविकास अधिकार्!यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आला आहे.

घाटंजी तालुक्यातील साखरा खुर्द गावात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलासाठी पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. मात्र, निवड प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याने अनेक गरजू पात्र नागरिकांवर अन्याय झाला आहे.

विशेष म्हणजे एका कुटुंबातील जवळच्या नात्यातील तीन व्यक्तींना घरकुलाचा लाभ मिळत असताना, स्वतःचे पक्के घर नसलेल्या व योजनेसाठी पात्र असलेल्या काही नागरिकांची नावे यादीतून वगळ्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. ग्रामपंचायत स्तरावर लाभार्थी निवड करताना ग्रामसभा, ग्रामपंचायत सदस्य तसेच संबंधित कर्मचार्!यांची भूमिका महत्त्वाची असताना तोंड पाहू धोरणातून ईतर पात्र लाभार्थी डावलून प्रत्यक्षात मात्र पात्र लाभार्थ्यांची निवड का झाली नाही, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे. घरकुल योजनेचा लाभ मिळण्यासाठी अनेक नागरिकांनी आवश्यक कागदपत्रे पूर्तता केली असूनही त्यांना डावलण्यात आल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ‘पात्रता असताना लाभ नाही, तर अपात्रांना लाभ कसा असा प्रश्न करत वंचित लाभार्थ्यांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी केली जावी अशी मागणीही निवेदनातून केली आहे. यावेळी रवींद्र चौधरी, अविनाश जाधव, प्रभाकर चौधरी, रामनंद चौधरी, गणेश चौहाणसह साखरा येथील घरकुलपासून वंचित लाभार्थी उपस्थित होते.

--------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande