जळगाव - जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या ९० टक्के पाऊस
जळगाव, 29 ऑगस्ट (हिं.स.) एल निनोचा प्रभाव असतानाही जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या सुमारे ९० टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतशिवारातील स्थिती सध्या चांगली असली, तरी दुसरीकडे हवामान विभागाच्या पावसाच्या अंदाजांबाबत मात्र प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे
जळगाव - जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या ९० टक्के पाऊस


जळगाव, 29 ऑगस्ट (हिं.स.) एल निनोचा प्रभाव असतानाही जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या सुमारे ९० टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतशिवारातील स्थिती सध्या चांगली असली, तरी दुसरीकडे हवामान विभागाच्या पावसाच्या अंदाजांबाबत मात्र प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचे प्रमाण आणि स्वरूप हवामान खात्याच्या अंदाजापेक्षा पूर्णपणे वेगळे राहिले आहे. १ जून ते २६ ऑगस्ट या कालावधीत हवामान विभागाने दिलेल्या विविध अंदाजांपैकी तब्बल १६ दिवसांचे अंदाज चुकीचे ठरले आहेत. वारंवार अंदाज चुकत असल्याने हवामान विभागाच्या कार्यक्षमतेवर आणि अंदाजांच्या अचूकतेवर जिल्ह्यात चर्चा सुरू झाली आहे.यंदा जिल्ह्यात अनेकदा हवामान विभागाकडून पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला. मात्र, अपेक्षित ठिकाणी पाऊस न पडता काही भागात अचानक पावसाच्या सरी कोसळल्या. काही वेळा अलर्ट जारी असतानाही पावसाने हुलकावणी दिली, तर अलर्ट नसलेल्या दिवशी काही भागांत जोरदार पाऊस झाला. या बदलत्या परिस्थितीमुळे हवामानाच्या अंदाजाबाबत नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.१ जून ते २६ ऑगस्ट या कालावधीतील आकडेवारीनुसार हवामान विभागाने एकूण १८ दिवस पावसाबाबत अलर्ट दिला. त्यापैकी केवळ २ दिवस अंदाज अचूक ठरला, तर १६ दिवस अंदाज चुकीचा ठरला. त्यामुळे अंदाज चुकण्याचे प्रमाण ८८ टक्के इतके राहिले आहे.स्थानिक वातावरणातील वेगाने होणारे बदल, भौगोलिक विस्तार आणि नैसर्गिक घटकांचा प्रभाव यांमुळे अंदाजांमध्ये फरक पडत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande