कृषी सहसंचालक पोहचले थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; संवाद साधत शेतीशाळेचे मार्गदर्शन
अमरावती, 29 ऑगस्ट (हिं.स.)। अमरावती विभागीय कृषी सहसंचालक डॉ. गणेश घोरपडे यांनी दर्यापूर तालुक्यातील मौजे शिंगणापूर, पनोरा गावातील शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जात खरीप पिकांची पाहणी केली. तसेच शेतकरी गटांशी संवाद साधुन मार्गदर्शन केले. यावेळी शिंगण
कृषी सहसंचालक पोहचले थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; संवाद साधत शेतीशाळेचे मार्गदर्शन


अमरावती, 29 ऑगस्ट (हिं.स.)।

अमरावती विभागीय कृषी सहसंचालक डॉ. गणेश घोरपडे यांनी दर्यापूर तालुक्यातील मौजे शिंगणापूर, पनोरा गावातील शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जात खरीप पिकांची पाहणी केली. तसेच शेतकरी गटांशी संवाद साधुन मार्गदर्शन केले.

यावेळी शिंगणापूर येथील प्रगतीशील शेतकरी संदिप लोहकपुरे यांच्या नैसर्गिक सोयाबीन शेतीशाळा प्रत्यक्षिक प्लॉटला भेट दिली व शेतीशाळेच्या माध्यमातून प्रत्यक्ष झालेला फायदा त्याचे व्यवस्थापण, जैविक निविष्ठा निर्मिती तसेच कपास क्रांती योजने अंतर्गत कापुस प्रक्षेत्राला भेट दिली. यावेळी पिक परिस्थिती जाणून घेतली.

पावसाच्या खंडात करावयाच्या उपाययोजने विषयी मार्गदर्शन केले. याचवेळी पनोरा येथील युवा पुरस्कार प्राप्त शेतकरी कुलदिप टोळे यांच्या ऍग्रोटेक फार्म लॅबला भेट देत फार्म लॅबच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेले उपक्रम व उत्पादीत ट्रायकोडर्मा, चिकट सापळे इतरमाहिती घेत शेतकऱ्याच्या समस्या जाणून घेत उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी प्रफुल सातव, आत्मा समितीचे उपसंचालक विवेक टेकाडे, तालुका कृषी अधिकारी आरती साबळे यासह कृषी विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande