परभणी - पाथरी आगारासाठी १५ राजमाता जिजाऊ बस उपलब्ध
परभणी, 29 ऑगस्ट (हिं.स.)। विधान परिषदेचे सदस्य आमदार सईद खान यांनी पाथरी आगारासाठी १५ राजमाता जिजाऊ बस उपलब्ध करून देण्याची मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेत पहिल्या टप्प्यात ५ ‘राजमाता जिजाऊ’ बस उपलब्ध क
अ


परभणी, 29 ऑगस्ट (हिं.स.)।

विधान परिषदेचे सदस्य आमदार सईद खान यांनी पाथरी आगारासाठी १५ राजमाता जिजाऊ बस उपलब्ध करून देण्याची मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली होती.

या मागणीची दखल घेत पहिल्या टप्प्यात ५ ‘राजमाता जिजाऊ’ बस उपलब्ध करून देण्यात आल्या असून, उर्वरित बस लवकरच उपलब्ध करून देण्याचे आश्वासन मंत्री महोदयांनी दिले.

यावेळी त्यांनी “नवीन आमदार साहेब, तुमचं काम एकदम जोरदार आहे. जितक्या बसेस लागतील तितक्या उपलब्ध करून देतो,” असा विश्वास दिला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande