
लातूर, 29 ऑगस्ट (हिं.स.)। एमपीएससीच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या औषध निरिक्षक पदाच्या परीक्षेचा पेपर फुटला आहे. या कारणानाने परीक्षा रद्द झाल्या असल्या तरी याबाबत विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात राजकारण केले जात आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या या पेपरफुटीमध्ये राजकारण न आणता नीटच्या धर्तीवर एमपीएससी पेपरफुटीचा तपास व्हावा अशी मागणी भाजपा शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी करत विद्यार्थी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बांधिल असल्याची ग्वाही त्यांनी दिलेली आहे.
औषध निरीक्षक पदाच्या परीक्षांचा पेपर फुटीचे विरोधकांकडून राजकारण केले जात असून त्यांना विद्यार्थ्यांच्या हिताशी किंवा त्यांच्या भवितव्याची कोणतीही चिंता नसल्याकडे लक्ष वेधत लातूर भाजपा शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी या पेपरफुटीत राजकारण करू नये, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. वास्तविक विद्यार्थी हितासाठी व त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी केंद्र व राज्य सरकार सातत्याने प्रयत्नशिल असून त्याकरिता विविध उपाययोजना करून वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत. आजचा तरुण हा उद्याच्या उज्ज्वल भारतासाठी अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडणार असल्यामुळे त्यांच्या हिताला सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्राधान्य दिले असल्याचे कव्हेकर यांनी स्पष्ट केले आहे.
पेपरफुटी ही विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी खेदजनक बाब असून नीट पेपरफुटीनंतरही केंद्र सरकारने अत्यंत योग्य पध्दतीने तपासाला महत्व दिले आहे. त्याच धर्तीवर एमपीएससी पेपरफुटीचाही तपास व्हावा, अशी मागणी करत भाजपा शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी विद्यार्थी हितासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बांधिल असल्याची ग्वाही दिली आहे. तसेच या विषयात विरोधकांनी कोणतेही राजकारण करू नये, अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis