
नांदेड, 29 ऑगस्ट (हिं.स.)।
एसटी महांडळाची नांदेड ते पेठवडज बस नांदेड-पेठवडज-कल्लाळी-रुई पर्यंत सोडण्याची मागणी करण्यात आली आणि दुसरी एक गाडी मुखेड-रुई-कल्लाळी-पेठवडजला जाऊन पुन्हा परत पेठवडज-कल्हाळी-रुई-मुखेड जाते ती गाडी कल्हाळी गावामध्ये दहा-साडेदहा वाजता येते. ती गाडी सकाळी ९ वाजता पेठवडज मार्गे जर कल्हाळी आली तर शाळेला जाणारे जवळपास शंभर दीडशे मुलं आहेत. शाळेच्या मुलांची सोय होईल आणि महाविद्यालयीन मुलांची शिक्षणाची सोय होईल ही मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली आहे.
त्या मागणीचा पाठपुरावा छत्रपती संभाजी नगरच्या विभागीय कार्यालयामध्ये करण्यात आला. त्याच्यानंतर नांदेडला अभय देशमुख (विभाग नियंत्रक, राज्य परिवहन नांदेड विभाग) यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यांनी सांगितलं की आठ दिवसाच्या आत आपण मागणी केलेल्या दोन्ही गाड्या तुम्ही मागितल्याप्रमाणे सोडण्याची व्यवस्था करतो, असे सांगितले. लगेच संबंधित अधिकाऱ्यांना दालनात बोलावून तत्काळ हालचाली सुरू करण्याचे आदेश दिले.
पाठपुराव्यामुळे व मागणीमुळे जो विद्यार्थ्यांचा ज्येष्ठ नागरिकांचा व व्यापारी वर्गाचा जो प्रवासाचा आटापिटा संपून सोयीस्कर प्रवास होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis