नांदेडमध्ये व्हॉईस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरमच्या केडर कॅम्पची जय्यत तयारी
नांदेड, 29 ऑगस्ट (हिं.स.)। व्हॉईस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरमच्या वतीने नांदेड येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य केडर कॅम्पची जय्यत तयारी सुरू असून, शहरात सर्वत्र पत्रकार आणि पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. विविध जिल्ह्यांतून येण
Q


नांदेड, 29 ऑगस्ट (हिं.स.)।

व्हॉईस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरमच्या वतीने नांदेड येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य केडर कॅम्पची जय्यत तयारी सुरू असून, शहरात सर्वत्र पत्रकार आणि पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. विविध जिल्ह्यांतून येणाऱ्या पत्रकारांचे स्वागत करण्यासाठी नांदेडची टीम सज्ज झाली असून, कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पदाधिकारी युद्धपातळीवर काम करत आहेत. स्वागत फलक, नियोजन बैठका आणि विविध व्यवस्थांमुळे नांदेड नगरी केडर कॅम्पच्या उत्साहाने सजून निघाली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande