अमरावती : हत्या प्रकरणानंतरही विद्याभारती परिसरात रात्रीची गर्दी कायम; कायदा-सुव्यवस्थेवर नागरिकांचा सवाल
अमरावती, 29 ऑगस्ट (हिं.स.)। शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण करणारे चित्र विद्याभारती महाविद्यालयालगतच्या परिसरात समोर आले आहे. मागील महिन्यात याच परिसरात एका तरुणाची हत्या झाल्याची गंभीर घटना घडली होती. मात्र, या घटनेनं
हत्या प्रकरणानंतरही विद्याभारती परिसरात रात्रीची गर्दी कायम; कायदा-सुव्यवस्थेवर नागरिकांचा सवाल


अमरावती, 29 ऑगस्ट (हिं.स.)। शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण करणारे चित्र विद्याभारती महाविद्यालयालगतच्या परिसरात समोर आले आहे. मागील महिन्यात याच परिसरात एका तरुणाची हत्या झाल्याची गंभीर घटना घडली होती. मात्र, या घटनेनंतरही परिसरातील रात्रीची वर्दळ आणि गर्दी कमी झालेली नसल्याने स्थानिक नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, परिसरातील कोको कॅफेसह काही आस्थापने रात्री उशिरापर्यंत सुरू राहत असून रात्री ११ वाजल्यानंतरही येथे तरुण-तरुणींच्या बैठका, गप्पा आणि मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते. मध्यरात्रीपर्यंत परिसरात गर्दी कायम राहत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.

विशेष म्हणजे, या ठिकाणापासून पोलीस आयुक्त कार्यालय अगदी जवळ असतानाही रात्रीच्या वेळी अशी परिस्थिती कायम असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. संबंधित आस्थापनांना रात्री उशिरापर्यंत व्यवसाय सुरू ठेवण्याची परवानगी आहे का, तसेच निर्धारित वेळा व इतर नियमांचे पालन होत आहे का, याबाबत प्रशासनाने स्पष्टता करावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान, परिसरातील सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस प्रशासन व महापालिका यंत्रणा या प्रकरणाची दखल घेऊन काय कारवाई करणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande