छ. संभाजीनगर - शिवसेना आमदार आणि भाजप जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांचा जोरदार वाद
छत्रपती संभाजीनगर, 29 ऑगस्ट (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर येथे महावितरणच्या आढावा बैठकीत शिवसेना आमदार रमेश बोरणारे आणि जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे यांच्यात जोरदार वाद झाला. महावितरणचे अधिकारी जनतेकडून पैसे घेत असल्याचा आरोप गलांडे यांनी केला.
छ. संभाजीनगर - शिवसेना आमदार आणि भाजप जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांचा जोरदार वाद


छत्रपती संभाजीनगर, 29 ऑगस्ट (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर येथे महावितरणच्या आढावा बैठकीत शिवसेना आमदार रमेश बोरणारे आणि जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे यांच्यात जोरदार वाद झाला. महावितरणचे अधिकारी जनतेकडून पैसे घेत असल्याचा आरोप गलांडे यांनी केला. संबंधित अधिकारी आमदारांचा कार्यकर्ता असल्याने त्यांना वाचवले जात असल्याचा आरोप करत गलांडे संतापले. अधिकाऱ्याच्या कामकाजावरून दोघांमध्ये शाब्दिक खडाजंगी झाली. यावर आमदार रमेश बोरणारे यांनी आपण कुणालाही पाठीशी घालत नसल्याचे स्पष्ट केले. संबंधित अधिकारी दोषी आढळल्यास त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करावी, अशी आपली भूमिका असल्याचे बोरणारे यांनी सांगितले. त्यामुळे बैठकीत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande