गणेशोत्सवात भारतीय संस्कृती व संस्कार जपणारी गाणी लावावी, श्रीराम प्रतिष्ठान ट्रस्टचे गणेश मंडळांना आवाहन
लातूर, 29 ऑगस्ट (हिं.स.)। गणेशोत्सव हा हिंदू संस्कृती, परंपरा आणि श्रद्धेचा उत्सव असून, या उत्सवाचे पावित्रय आणि सांस्कृतिक महत्त्व जपण्यासाळी उदगीर शहरातील सर्व गणेश मंडळांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन श्रीराम प्रतिष्ठान ट्रस्ट, उदगीर यांच्या वतीन
श्रीराम प्रतिष्ठान ट्रस्ट उदगीर


लातूर, 29 ऑगस्ट (हिं.स.)।

गणेशोत्सव हा हिंदू संस्कृती, परंपरा आणि श्रद्धेचा उत्सव असून, या उत्सवाचे पावित्रय आणि सांस्कृतिक महत्त्व जपण्यासाळी उदगीर शहरातील सर्व गणेश मंडळांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन श्रीराम प्रतिष्ठान ट्रस्ट, उदगीर यांच्या वतीने करण्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या काळात मंडळांनी ध्वनिक्षेपकावर गाणी लावताना बॉलिवूड किंवा हॉलिवूडमधील केबळ मनोरंजनप्रधान गाण्यांऐवजी भारतीय संस्कृती, अध्यात्म, भकी आणि देशभकीचे दर्शन घडविणान्या गीतांना प्राधान्य द्यावे, अशी विनंती करण्यात आली आहे. श्री गणेशाच्या भक्तीबरोबरच श्रीराम, हनुमान तसेच देवी-देवतांची भक्तिगीते, अभंग, कीर्तन व भजने यांचे सादरीकरण करावे, असेही ट्रस्टने म्हटाले आहे.

गणेशोत्सवाच्या काळात आयोजित होणान्या नृत्य स्पर्धामध्येही असांस्कृतिक अथवा केवळ मनोरंजनप्रधान गाण्यांऐवजी भारतीय संस्कृती व संस्कार जपणान्या गीतांवर आधारित नृत्यांना प्राधान्य द्यावे. अशा विषयांचा समावेश केल्याने उत्सवाचे सांस्कृतिक, अध्यात्मिक आणि राष्ट्रभक्तीपर मूल्य दृढ होतील.

भारतीय संस्कृती व संस्कारांवर आधारित गीत-संगीत आणि नृत्यामुळे मनोरंजनासोबतच नव्या पिढीवर संस्कार रुजण्यास मदत होईल. तसेच गणेशोत्सवाचे वातावरण अधिक मंगलमय, भक्तिमय आणि प्रेरणादायी होण्यास हातभार लागेल, असा विश्वास ट्रस्टने व्यक्त केला आहे.

चला, यंदाचा गणेशोत्सव भकी, संस्कार आणि भारतीय संस्कृतीच्या गौरवाचा उत्सव बनवूया, असे आवाहन करत सर्व गणेश मंडळांनी या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद द्यावा, अशी विनंती श्रीराम प्रतिष्ठान ट्रस्ट, उदगीर यांच्या वतीने करण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande