जळगाव - विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर रेल्वेची दंडात्मक कारवाई; 2.46 लाखांचा दंड वसूल
जळगाव, 29 ऑगस्ट, (हिं.स.) रेल्वेने विनातिकीट किंवा अनधिकृतपणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात भुसावळ रेल्वे विभागाने विशेष मोहीम राबवली. भुसावळसह जळगाव, नाशिक रोड, मनमाड, खंडवा, अकोला, बडनेरा आणि अमरावती या प्रमुख स्थानकांवर एकाच वेळी करण्यात आलेल्
जळगाव - विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर रेल्वेची दंडात्मक कारवाई; 2.46 लाखांचा दंड वसूल


जळगाव, 29 ऑगस्ट, (हिं.स.) रेल्वेने विनातिकीट किंवा अनधिकृतपणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात भुसावळ रेल्वे विभागाने विशेष मोहीम राबवली. भुसावळसह जळगाव, नाशिक रोड, मनमाड, खंडवा, अकोला, बडनेरा आणि अमरावती या प्रमुख स्थानकांवर एकाच वेळी करण्यात आलेल्या तपासणीत 323 प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आली. या कारवाईत रेल्वे प्रशासनाने संबंधित प्रवाशांकडून एकूण 2 लाख 46 हजार 825 रुपयांचा दंड वसूल केला आहे. अनधिकृत प्रवासाला आळा घालण्यासाठी भुसावळ रेल्वे विभागाकडून विशेष ‘फोर्स्ड तिकीट तपासणी मोहीम’ राबविण्यात आली.

या मोहिमेअंतर्गत विभागातील आठ प्रमुख स्थानकांवर एकाच वेळी प्रवाशांची तिकीट तपासणी करण्यात आली. भुसावळ, जळगाव, नाशिक रोड, मनमाड, खंडवा, अकोला, बडनेरा आणि अमरावती या स्थानकांवर रेल्वे कर्मचाऱ्यांनी तपासणी केली.

विशेष तपासणीदरम्यान विनातिकीट किंवा अनधिकृत पद्धतीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. एकूण 333 प्रकरणे आढळून आली असून त्यांच्याकडून 2 लाख 46 हजार 825 रुपये दंड वसूल करण्यात आला. या मोहिमेत 95 तिकीट तपासणी कर्मचारी आणि रेल्वे सुरक्षा दलाचे 8 कर्मचारी सहभागी झाले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande