बीड : चिंचोलीमाळीत युवकाचे पाण्याच्या टाकीवर आंदोलन
बीड, 29 ऑगस्ट (हिं.स.)। केज तालुक्यातील चिंचोलीमाळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे हस्तांतरण रखडल्याने सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल झाडे यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू केले. स्वातंत्र्यदिनी आत्मदहनाचा इशारा देऊनही जिल्हा परिषद ब
आंदोलन


बीड, 29 ऑगस्ट (हिं.स.)।

केज तालुक्यातील चिंचोलीमाळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे हस्तांतरण रखडल्याने सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल झाडे यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू केले. स्वातंत्र्यदिनी आत्मदहनाचा इशारा देऊनही जिल्हा परिषद बांधकाम विभागाने १३ दिवसांत दुरुस्ती व त्रुटींची पूर्तता करून इमारत हस्तांतरित केली नसल्याचा आरोप झाडे यांनी केला आहे. मागणी पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande