सेलूतील ‘अमृत दौड’ला तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद
परभणी, २९ ऑगस्ट (हिं.स.) : भारतीय शिक्षण प्रसारक संस्था, अंबाजोगाईच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त तसेच मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून विवेकानंद प्राथमिक विद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘अमृत दौड’
सेलूतील ‘अमृत दौड’ला तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद


परभणी, २९ ऑगस्ट (हिं.स.) : भारतीय शिक्षण प्रसारक संस्था, अंबाजोगाईच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त तसेच मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून विवेकानंद प्राथमिक विद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘अमृत दौड’ उपक्रमाला तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. निरोगी जीवनशैली, व्यायामाची आवड आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यासाठी आयोजित या दौडीत युवक-युवतींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.

‘चला धावूया, निरोगी राहू या’ हा संदेश देत उत्साहपूर्ण वातावरणात दौड पार पडली. सहभागी धावपटूंनी उत्साहाने दौड पूर्ण करत आरोग्य आणि तंदुरुस्तीचे महत्त्व अधोरेखित केले. भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यात येत असून, ‘अमृत दौड’ हा त्याच उपक्रमांचा एक भाग होता.दौडला जिल्हा परिषदेचे माजी गटनेते तथा उद्योजक राम नाना खराबे (पाटील), सेलू उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय हरबडे आणि स्थानिक कार्यवाह उपेंद्र बेल्लूरकर यांच्या हस्ते झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली. मंठा रोड ते बोर्डीकर कृषी महाविद्यालय या मार्गावरून दौड आयोजित करण्यात आली होती.

स्पर्धेच्या मुलांच्या गटात परभणी येथील कुमार डिफेन्स अकॅडमीचा आदित्य गणेश कुर्हे याने प्रथम क्रमांक पटकावला. मुंजाजी नामदेव अमोघे याने द्वितीय, तर सेलू येथील गटकळ करिअर अकॅडमीचा अर्जुन विलास राठोड याने तृतीय क्रमांक मिळविला.मुलींच्या गटात गटकळ करिअर अकॅडमीच्या पल्लवी प्रल्हाद माने हिने प्रथम क्रमांक मिळविला. कुसुम बाळू आढे हिने द्वितीय, तर राधा ज्ञानेश्वर गवळी हिने तृतीय क्रमांक पटकाविला.

विजेत्या स्पर्धकांना डॉ. रवींद्र घोडके आणि डॉ. दिगंबर घोडके यांच्या वतीने बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रमासाठी गणेश माळवे, संजय भूमकर आणि सुभाष मोहकरे यांनी पंच म्हणून काम पाहिले.गटकळ करिअर अकॅडमीचे गोरखनाथ राऊत, योगेश राठोड तसेच कमांडो करिअर अकॅडमीचे सचिन काकडे आणि सतीश जाधव यांचे मोलाचे सहकार्य लाभले. पोलीस प्रशासन

--------------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande