लातूरमध्य विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी जिल्हा परिषद सदस्यांचा पुढाकार
दीपाली भोसलेंनी मातोळाच्या शाळेत बसवला आरओ प्लांट लातूर, २९ ऑगस्ट (हिं.स.) : शासकीय निधीची प्रतीक्षा न करता विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न थेट हातात घेत जिल्हा परिषद सदस्य दिपालीताई शाम भोसले यांनी आदर्शवत उपक्रम राबविला आहे. मातोळा येथील माध
स्वखर्चातून आर ओ प्लांट


दीपाली भोसलेंनी मातोळाच्या शाळेत बसवला आरओ प्लांट

लातूर, २९ ऑगस्ट (हिं.स.) : शासकीय निधीची प्रतीक्षा न करता विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न थेट हातात घेत जिल्हा परिषद सदस्य दिपालीताई शाम भोसले यांनी आदर्शवत उपक्रम राबविला आहे. मातोळा येथील माधवराव भोसले हायस्कूलमधील सुमारे ७०० विद्यार्थ्यांसाठी त्यांनी स्वखर्चातून दीड लाखांहून अधिक रुपये खर्च करून आरओ प्लांट उभारला आहे.

शाळेत अनियमित पाणीपुरवठ्यामुळे विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत होता. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून ही समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी दिपालीताई भोसले यांनी पुढाकार घेतला. शासन अथवा जिल्हा परिषदेच्या निधीची वाट न पाहता स्वतःच्या खर्चातून आरओ प्लांट उभारण्यात आल्याने आता विद्यार्थ्यांना शुद्ध आणि सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे.

शुद्ध पिण्याचे पाणी ही केवळ सुविधा नसून विद्यार्थ्यांची मूलभूत गरज आहे, या भूमिकेतून हा उपक्रम राबविण्यात आला. सुमारे ७०० विद्यार्थ्यांना दररोज या सुविधेचा लाभ मिळणार असल्याने या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.

लोकप्रतिनिधींनी केवळ शासकीय निधीवर अवलंबून न राहता स्थानिक समस्या ओळखून स्वतः पुढाकार घेतल्यास त्याचा थेट लाभ नागरिकांना मिळू शकतो. दिपालीताई भोसले यांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत स्वखर्चातून उभारलेला आरओ प्लांट सामाजिक बांधिलकी आणि लोकप्रतिनिधित्वाचा वेगळा आदर्श ठरत आहे.या उपक्रमाचे पालक, ग्रामस्थ तसेच शिक्षणप्रेमींकडून कौतुक होत आहे.

------------------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande