रत्नागिरी : दोन एसटी गाड्यांची समोरासमोर टक्कर, २१ प्रवासी जखमी
रत्नागिरी, 29 ऑगस्ट (हिं.स.) । आंबडस (ता. चिपळूण) परिसरातील खांदाट गवळवाडी येथील चिरणी फाट्याजवळ दोन एसटी बसेसची समोरासमोर धडक होऊन २१ जण जखमी झाले. जखमींमध्ये १८ प्रवाशांसह दोन चालक आणि एका वाहकाचा समावेश आहे. चिपळूणहून चोरवणेच्या दिशेने जाणारी
अपघातग्रस्त एसटी बसेस


रत्नागिरी, 29 ऑगस्ट (हिं.स.) । आंबडस (ता. चिपळूण) परिसरातील खांदाट गवळवाडी येथील चिरणी फाट्याजवळ दोन एसटी बसेसची समोरासमोर धडक होऊन २१ जण जखमी झाले. जखमींमध्ये १८ प्रवाशांसह दोन चालक आणि एका वाहकाचा समावेश आहे.

चिपळूणहून चोरवणेच्या दिशेने जाणारी एसटी बस आणि कासईहून चिपळूणकडे येणारी एसटी बस खांदाट गवळवाडी येथील वळणावर समोरासमोर धडकल्या. तीव्र उतार आणि धोकादायक वळणावर वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे.

अपघातानंतर घटनास्थळी तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले. सर्व जखमींना घटनास्थळावरून बाहेर काढून उपचारासाठी कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. घटनास्थळी बचावकार्य पूर्ण करण्यात आले आहे.

एसटी महामंडळाच्या आगार प्रमुख रणजित राजेशिर्के यांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, या अपघातात १८ प्रवासी जखमी झाले असून, दोन चालक आणि एका वाहकासह एकूण २१ जण जखमी झाले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande